मुंबई - राज्यात आता रात्रीचा गारवा कमी होऊन उकाडा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तवला. राज्याला उष्णतेचा दुहेरी ताप सोसावा, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, की हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांसाठी तापमान आणि पावसाबाबतचा विस्तारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेची तीव्रता किंचित कमी राज्यभरातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता काहीशी कमी झाली असली तरी विदर्भातील सर्व शहरांचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच आहे. उर्वरित राज्यात पारा ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान आहे.
चंद्रपूर सर्वाधिक उष्णराज्यात गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४४.६ अंश सेल्सिअस झाली.
Web Summary : Maharashtra faces increased nighttime heat after a month-long heatwave. Vidarbha experiences temperatures above 40°C, with Chandrapur recording a scorching 44.6°C. The heatwave's intensity has slightly decreased, but high temperatures persist across the state, according to weather experts.
Web Summary : महाराष्ट्र में महीने भर की गर्मी के बाद रात में भी गर्मी बढ़ रही है। विदर्भ में तापमान 40 डिग्री सेल्सियस से ऊपर, चंद्रपुर में 44.6 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। मौसम विशेषज्ञों के अनुसार, लू की तीव्रता थोड़ी कम हुई है, लेकिन राज्य में उच्च तापमान बना हुआ है।