वॉशिंग्टन - 'होर्मुझची सामुद्रधुनी' इराणच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवी योजना सादर केली आहे. या योजनेत इराणच्या बंदरांची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. ट्रम्प यांच्या या योजनेमुळे इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १२६ डॉलरवर पोहोचल्या आहेत. या महागाईचा फटका अमेरिकेसह संपूर्ण जगाला बसत असल्याने, ट्रम्प यांना हा मार्ग लवकरात लवकर खुला करायचा आहे.
सरकारी दूरचित्रवाणीवर खामेनेई यांचे निवेदन प्रसारित करण्यात आले. यात पर्शियाच्या आखातात अमेरिकेची जागा समुद्राच्या तळाशी असल्याचा टोमणा मारत आखाती प्रदेशाचे भविष्य अमेरिकेच्या हाती नाही, असे ते म्हणाले.
योजनेतील प्रस्तावनव्या योजनेनुसार, अमेरिकेचे नौदल इराणच्या बंदरांवरील आपली नाकेबंदी अधिक कडक करेल, त्याने इराणची तेल निर्यात ठप्प होईल. आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा खंडित करण्याचे इराणचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अमेरिका आपल्या मित्रराष्ट्रांसोबत मिळून कडक पावले उचलणार आहे. इराणचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अन्य राजनयिक आणि लष्करी धोरणांचा पुन्हा विचार.
‘इराण अण्वस्त्र-क्षेपणास्त्र क्षमता सोडणार नाही’इराण आपली अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमता कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा थेट इशारा इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी अमेरिकेला दिला आहे. नॅनो तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानाप्रमाणेच अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमता ही ९ कोटी इराणी जनतेची 'राष्ट्रीय संपत्ती' आहे आणि त्याचे प्राणपणाने रक्षण केले जाईल. आमचे सैन्य अजून मजबूत असल्याचे ही खामेनेई म्हणाले.
Web Summary : Trump unveils a plan to blockade Iranian ports, escalating tensions. Iran dismisses US influence in the Gulf, vowing to maintain its nuclear capabilities and missile program, considering it a national asset. Oil prices surge amid the crisis.
Web Summary : ट्रंप ने ईरानी बंदरगाहों को ब्लॉक करने की योजना का अनावरण किया, जिससे तनाव बढ़ गया। ईरान ने खाड़ी में अमेरिकी प्रभाव को खारिज कर दिया, और अपनी परमाणु क्षमताओं और मिसाइल कार्यक्रम को बनाए रखने की कसम खाई, इसे राष्ट्रीय संपत्ति माना। संकट के बीच तेल की कीमतें बढ़ीं।