शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 08:14 IST

मिसिंग लिंक प्रकल्पात २२.३३ मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात आला आहे.

अमर शैलामुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई आणि पुणे यांच्यादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या बोगद्याला जगातील सर्वांत रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारणी केलेला हा बोगदा तब्बल २३.५ मीटर रुंदीचा आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  होत असून, याच कार्यक्रमात गिनीज समितीकडून हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

प्रवास आणखी वेगात...मुंबई ते पुण्यादरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावर सध्या खंडाळा घाटात अनेकदा वाहतूककोंडी होते. त्यावर पर्याय म्हणून खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत (सिंहगड कॉलेज) १३.३ किमी लांबीचा मार्ग उभारला असून, त्यात दोन बोगदे आहेत. त्यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी ८.८७ किलोमीटर असून, दुसरा बोगदा १.६८ किमी लांबीचा आहे. या प्रत्येक दिशेच्या बोगद्यात वाहतुकीसाठी चार मार्गिका, तसेच एक सर्व्हिस लेन अशा पाच मार्गिका उभारण्यात आल्या आहेत. 

महाकाय बोगदा...एवढ्या रुंदीचा बोगदा तयार करताना माती ढासळण्याची भीती असते. त्यामुळे सहसा १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे बोगदे खणले जात नाहीत. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पाहता २३.५ मीटर  रुंदीचा बोगदा तयार केला आहे तसेच बोगद्यातील अंतर्गत सुरक्षेची कामे केल्यानंतर त्याची रुंदी साधारणपणे २२.३३ मीटर एवढी आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पात २२.३३ मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. जगातील हा सर्वाधिक रुंदीचा बोगदा ठरला असून, त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. - राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Missing Link Enters Guinness, Cuts Travel Time Significantly

Web Summary : The Mumbai-Pune Missing Link tunnel, now in Guinness World Records for width, opens Maharashtra Day. The 23.5-meter wide tunnel shortens travel time via the expressway, bypassing Khopoli traffic. This 13.3 km route includes two tunnels, significantly improving connectivity.
टॅग्स :Mumbai Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे