Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर

By कोमल खांबे | Updated: May 1, 2026 09:04 IST

"शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं...", 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Raja Shivaji: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात बॉलिवूड कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुखच्या या ऐतिहासिक सिनेमात सलमान खान कैमिओ करणार असल्याच्या चर्चा होत्या. रितेशनेही 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खान दिसणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र ट्रेलरमध्ये सलमानची झलक दिसली नव्हती. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'राजा शिवाजी'मधील सलमान खानच्या भूमिकेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

एका युजरने एक्स अकाऊंटवरुन 'राजा शिवाजी'मधला सलमानच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सलमान खानचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. भगव्या रंगाचा अंगरखा, डोक्यावर फेटा आणि पिळदार मिश्या असा सलमानचा लूक दिसत आहे. तलवार हातात घेऊन सलमानची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा बाजूला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असलेला रितेश देशमुख उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. शत्रूला कंठस्नान घालणाऱ्या शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जीवा महालाच्या भूमिकेत सलमान दिसणार आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओतील सलमानच्या डायलॉगने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. "शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं...", या डायलॉगलला थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या ऐकू येत आहेत. 

'राजा शिवाजी' सिनेमातीला सलमानच्या एन्ट्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण काही कारणांमुळे सलमानच्या एन्ट्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्यात आला आहे. या सिनेमात सलमानसोबत अभिषेक बच्चन, विद्या बालन, जिनिलीया देशमुख, बोमन इराणी, संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक १०० कोटींचं बजेट असलेला ऐतिहासिक सिनेमा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Raja Shivaji: Salman Khan's Maratha look revealed in Ritesh Deshmukh's film.

Web Summary : Salman Khan's cameo in 'Raja Shivaji' is creating buzz. His Maratha look, as Jiva Mahala, with a saffron turban and twirled mustache, is winning hearts. The movie also stars Abhishek Bachchan, Vidya Balan, and others.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटरितेश देशमुखसलमान खान