शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 06:18 IST

१५ मेपर्यंत ऑनलाइन माहिती भरण्याची संधी, जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई - राज्यात १ मेपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, यावेळी प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा टप्पा ऐच्छिक असणार असून १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे.

राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. देशातील ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असून नागरिकांच्या सहभागाला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्व-गणना कशी कराल?संकेतस्थळ : se.census.gov.in/एका कुटुंबासाठी एकच अर्जएकूण ३३ प्रश्नांची माहिती भरावी लागेल. ती अचूक भरा.कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाहीमाहिती पूर्ण भरल्यावर  तुम्हाला ११ अंकी युनिक आयडी मिळेल.हा आयडी पुढील पडताळणीसाठी जतन करून ठेवणे आवश्यक

‘घरगणना’ कधी?१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना अधिकारी घरोघरी जाऊन ‘घरगणना’ करतील. स्व-गणना केली आहे, त्यांच्या माहितीची पडताळणी केली जाईल. यावेळी युनिक आयडी दाखवणे आवश्यक असेल. तर स्व-गणना न केलेल्या नागरिकांची माहिती अधिकारी स्वतः भरून घेतील.

घ्या ही काळजीअधिकृत संकेतस्थळावरच माहिती भरासंशयास्पद लिंक किंवा संदेश टाळाएसएमएस/ई-मेलचा स्रोत तपासावैयक्तिक कागदपत्रे अपलोड करू नका

२.६४ लाख कर्मचारी तैनातया जनगणनेसाठी राज्यभरात सुमारे २.६४ लाख क्षेत्रीय कर्मचारी, जनगणना अधिकारी आणि पर्यवेक्षक तैनात करण्यात येणार असून १० टक्के राखीव कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Launches Digital Census with Self-Enumeration Option Starting Today

Web Summary : Maharashtra begins its digital census May 1st, offering self-enumeration via se.census.gov.in until May 15th. Unique ID is generated. Door-to-door enumeration starts May 16, 2026 for verification.