शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 06:14 IST

काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा,‘प्रहार’चे बच्चू कडू शिंदेसेनेचे आमदार; नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी

मुंबई - उमेदवार देण्याची आधी केलेली घोषणा मागे घेत काँग्रेसने उद्धव सेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना दिलेला पाठिंबा, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिंदेसेनेत विलीन करत मिळविलेली उमेदवारी, राष्ट्रवादीने (अजित पवार गट) चर्चेतील नावांना खो देत झिशान सिद्दिकी यांच्या नावाला दिलेली पसंती, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा मिळालेली संधी अशा घटनाक्रमानंतर विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली असून औपचारिक घोषणा बाकी आहे. 

भाजपचे सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, डॉ. प्रज्ञा सातव, शिंदेसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) झिशान सिद्दिकी हे महायुतीचे नऊ जण तर महाविकास आघाडी समर्थित उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

एकूण आले १७ अर्ज या निवडणुकीत पक्षांच्या ९ पैकी चार उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय चार उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. अर्जांची छाननी २ मे रोजी होईल. अपक्षांच्या अर्जावर अनुमोदक, सूचक यांच्या सह्या नसल्याने हे अर्ज बाद होतील. अर्ज मागे घेण्याची मुदत ४ मे आहे. या मुदतीनंतर निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात येईल.

भाजपच्या सहाही उमेदवारांनी विधानभवनात उमेदवारी अर्ज भरले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे आणि कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, झिशान सिद्दिकी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या तर अंबादास दानवे यांनी अनिल परब आदी उपस्थित होते. उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत विलीन केला आणि आमदारकी मिळविली. शिंदेसेनेने गुरुवारी दुपारपर्यंत सस्पेन्स कायम ठेवत डॉ. नीलम गोऱ्हे आणि कडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. २०२४ मध्ये हत्या झालेले माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेतृत्वाने स्पर्धेतील इतरांना धक्का दिला. पुन्हा आमदारकी न मिळू शकलेले अमोल मिटकरी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Legislative Council: Ten Seats Unopposed; MahaYuti Secures Nine

Web Summary : Amidst political maneuvers, ten Maharashtra Legislative Council seats go unopposed. MahaYuti secured nine seats, including BJP's and Shinde Sena's candidates. MVA got one, with Uddhav Sena's candidate winning.
टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2026BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे