शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 21:03 IST

दावडीतील तरुणाची हत्या करून प्रेताची जंगलात लावली होती विल्हेवाट

कल्याण : तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासातून उलगडा केला. याप्रकरणामुळे रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) याचा आणखी एक कारनामा पुढे आला असून त्याच्यासह चंद्रकांत बाळाराम गायकर आणि सुरेश गोपाळ देगावत उर्फ छोटू (३२) या तिघांना अटक करण्यात आली आहे. सात एकर जमीन व्यवहारातील पैशांच्या वादातून करण अरविंद बागुल (२३) या तरुणाची हत्या करून त्याचे प्रेताची विल्हेवाट मुरबाड येथील जंगलात केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत दिली.डोंबिवली पूर्वच्या दावडी येथील २३ वर्षीय तरुणाचे २०१४ मध्ये अपहरण झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून केलेल्या चौकशीत त्याने इतर साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली.रील स्टार पाटील आणि मयत करण बागुल याच्यासोबत जमीन विकासाच्या आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी त्याचे अपहरण करून त्याला दावडी येथील पाटील याच्या एका कार्यालयात नेण्यात आले. तेथे मुख्य आरोपी पाटील याने लोखंडी रॉडने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने मृतदेह कारमधून मुरबाड येथील बारवी धरण परिसरातील जंगलात नेऊन त्याची विल्हेवाट लावली.या प्रकरणात मुरबाड पोलिस ठाण्यात त्या काळात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाशी संबंधित नोंदी तपासून तोच मृतदेह असल्याची खात्री करण्यात आली. त्यानुसार मूळ अपहरणाच्या गुन्ह्यात खून व पुरावा नष्ट करण्याची कलमे जोडण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खूनासाठी वापरलेला लोखंडी रॉडही जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Reel star's crime: 12-year-old kidnapping-murder case solved.

Web Summary : Kalyan crime branch solved a 12-year-old kidnapping and murder case, revealing reel star Patil's involvement. He, along with two others, were arrested for killing Karan Bagul over a land deal dispute in 2014 and disposing of the body in Murbad forest.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस