Join us
Daily Top 2Weekly Top 5

GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)

 किंग कोहलीनं सलग पाच चौकारासह मारली गेलच्या क्लबमध्ये एन्ट्री

By सुशांत जाधव | Updated: April 30, 2026 20:51 IST

Open in App

IPL 2026 GT vs RCB Kagiso Rabada Gets His Revenge Virat Kohli : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीनंगुजरात टायटन्सचा जलदगती गोलंदाजाच्या पहिल्याच षटकात सलग ५ चौकारासह २१ धावा कुटल्या. संघाला आक्रमक अंदाजात सुरुवात करून देताना किंग कोहलीनं खास विक्रमाला गवसणी घातली. पण पुढच्याच षटकात रबाडाने दमदार कमबॅक करत त्याचा खेळ खल्लास करून धुलाई केल्याचा बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 किंग कोहलीनं सलग पाच चौकारासह मारली गेलच्या क्लबमध्ये एन्ट्री

आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की, आयपीएल विराट कोहली आणि कगिसो रबाडा या दोघांमधील सामना नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात RCB च्या डावातील दुसऱ्या षटकात कगिसो रबाडा आपलं पहिले षटक घेऊन आला. या षटकात किंग कोहलीनं सलग पाच चौकार मारले. या षटकातील शेवटच्या चेंडूवरही त्याने उत्तम फटका खेळला, पण रबाडाने कसा बसा तो फटका अडवला आणि एका षटकात ६ चौकार खाण्यापासून तो वाचला. विराट कोहली हा ख्रिस गेल आणि शेन वॉटसन यांच्यानंतर एका षटकात सलग ५ चौकार मारणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा तिसरा फलंदाज ठरला. पण पुढच्याच षटकात रबाडाने दमदार कमबॅक करत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. 

डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला

  • ५ - ख्रिस गेल विरुद्ध ईश्वर पांडे  (पुणे वॉरियर्स इंडिया), बंगळूरु, २०१३
  • ५ - शेन वॉटसन विरुद्ध थिसारा परेरा (रायझिंग पुणे सुपर जाएंटस), बंगळुरु, २०१६
  • ५ - विराट कोहली विरुद्ध कागिसो रबाडा  (गुजरात टायटन्स), अहमदाबाद, २०२६

GT च्या गोलंदाजाने असा घेतला बदला

आपल्या पहिल्याच षटकात पाच चौकार दिल्यानंतर, कागिसो रबाडाने जोरदार पुनरागमन केले. त्याने आपल्या दुसऱ्या षटकात आखूड टप्प्याच्या चेंडूवर विराट कोहलीला फसवले. मोठा फटका मारण्याचा कोहलीचा प्रयत्न फसला अन् राशीद खान त्याचा झेल टिपला. कोहली १३ चेंडूत २८ धावा करून माघारी फिरला. पहिल्या षटकात पाच चौकारसह धुलाई करणाऱ्या विराटची टी-२० मध्ये रबाडाने पाचव्यांदा शिकार केली. कोहलीनं त्याच्यासोह ७९ चेंडूत १११ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. यात १३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kohli Equals Gayle's Record, Rabada Retaliates in GT vs RCB Clash

Web Summary : Virat Kohli matched Gayle's record with five consecutive fours before Rabada dismissed him. Kohli scored 28 off 13, but Rabada took his revenge by getting Kohli caught out by Rashid Khan. Rabada made a strong comeback after conceding 20 runs in his first over.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्सविराट कोहली