शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:30 IST

आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफ व गोकूळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यावर टीका केली. त्यास मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले.

कोल्हापूर : भाजपचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या जीवनातील जास्तीत-जास्त दिवस कुठे खर्ची घातलेत, याची सविस्तर माहिती आम्हाला आहे, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी लगावला.

आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफ व गोकूळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यावर टीका केली. त्यास मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंदगडचे जे आमदार आहेत त्यांचे शिक्षण किती, त्यांचे पूर्वायुष्य काय याबद्दल सगळी माहिती मला आहे. त्यांनी आपल्या जीवनातील जास्तीत-जास्त दिवस कुठे खर्ची घातलेत, याचीही सविस्तर माहिती आम्हाला आहे. खरेतर मी त्याबद्दल फारसे काही बोलणारच नव्हतो. परंतु; ते नाहकरित्या सातत्याने माझ्यासह नविदबद्दल बदनामीकारक बोलत आहेत. एकदाचा त्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीच त्यांना हे शेवटचे उत्तर देत आहे. त्यानंतर त्यावर बोलणार नाही. त्यांनी हे जर थांबवलं नाही तर आम्ही आणि शिंदेसेनेच्या ज्यांच्यावर त्यांनी टीका केली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येत्या मंगळवारी, बुधवारी भेटून थेट विचारणार आहोत.आमचे लोक त्यांना मते देणार नाहीत.. -ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात घेतलेल्या एका सभेमुळे त्यांच्या आठ जागा पडल्या हे त्यांचे दुःखही समजू शकतो. परंतु; ते ज्या पद्धतीने आमची नाहक बदनामी करत आहेत. त्यामुळे आमचे लोक संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. त्यांनी गोकूळच्या निवडणूकीत उभा केलेल्या उमेदवारांना आमचे लोक मते देतील, याची खात्री देऊ शकत नाही. ही गोष्टही आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif Retorts: Shivajirao, what's your education, past life all about?

Web Summary : Minister Hasan Mushrif criticizes BJP MLA Shivajirao Patil's education and past, accusing him of baseless defamation. Mushrif threatens to reveal more if Patil continues, and will address the issue with Chief Minister Shinde and Fadnavis.
टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफPoliticsराजकारणBJPभाजपा