Sameer Rizvi accused of forcing girlfriend Yesha Sagar : आयपीएल २०२६ स्पर्धेतील राजस्थान विरुद्धच्या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील उदयोन्मुख भारतीय अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवी मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. या क्रिकेटरच नाव सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि प्रेझेंटर येशा सागरसोबत जोडलं जात आहे. दोघांनीही नात्याबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र त्यांच्यासंदर्भातील एक खळबळजनक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोशल मीडियावरील आरोपांमुळे उडाली खळबळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, IPL मध्ये लक्षवेधी ठरलेल्या क्रिकेटपटूने नातेसंबंधात असलेल्या महिला अँकरला काही धार्मिक प्रथा पाळण्यास, सोशल मीडिया फोटो हटवण्यास आणि वैयक्तिक वर्तनात बदल करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धर्मांतरासंदर्भात दबाव टाकल्याचेही दावे करण्यात आले आहेत.
ती पोस्ट अन् DC च्या ताफ्यातील क्रिकेटसोबत जोडलं तिचं नाव
पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनंतर या चर्चेला अधिक वेग आला. त्यांनी उत्तर प्रदेशातील एका क्रिकेटपटू आणि महिला अँकरमधील कथित नातेसंबंधाचा उल्लेख केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर समीर रिझवी आणि येशा सागर यांची नावं या चर्चेशी जोडली गेली. सध्या हे प्रकरण केवळ सोशल मीडिया पोस्ट्स आणि अफवांपुरतंच मर्यादित आहे. कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.
कोण आहे येशा सागर?
१४ डिसेंबर १९९६ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे जन्मलेल्या येशा सागरने बालपण भारतात घालवलं. पुढे उच्च शिक्षणासाठी ती २०१५ मध्ये टोरांटो, कॅनडा येथे गेली. सेनेका कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात करिअरची वाटचाल सुरू केली. मॉडेलिंग, अभिनय आणि प्रेझेंटरच्या रुपात ओळख निर्माण करणाऱ्या येशाने पंजाबी संगीतसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली. तिने गिप्पी ग्रेवाल, परमिश वर्मा आणि कुलबीर झिंजर यांसारख्या कलाकारांसोबतच्या म्युझिक व्हिडिओंमधून लोकप्रियता मिळवली आहे.
Web Summary : IPL's Sameer Rizvi faces allegations of pressuring his girlfriend, Yesha Sagar, to change her religious practices and personal behavior. The claims surfaced after a journalist's social media post hinted at the situation, linking Rizvi and Sagar. Currently, these are unconfirmed rumors.
Web Summary : समीर रिज़वी पर गर्लफ्रेंड येशा सागर पर धार्मिक रीति-रिवाजों और निजी व्यवहार को बदलने का दबाव डालने का आरोप है। एक पत्रकार के सोशल मीडिया पोस्ट के बाद ये दावे सामने आए, जिसमें रिज़वी और सागर को जोड़ा गया। फिलहाल, ये अपुष्ट अफवाहें हैं।