शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:45 IST

हे सर्व अंदाज बनावट आहेत आणि एक्झिट पोल भाजपच्या कार्यालयातून आले आहेत," असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आलेले सर्व एक्झिट पोल गुरुवारी फेटाळून लावले. तसेच, आपण पुन्हा एकदा "मा, माटी, मानुष" चे सरकार स्थापन करत आहोत, असा विश्वास व्यक्त केला आहे. "हे आकडे केवळ तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी जाहीर करण्यात आले आहेत. हे सर्व अंदाज बनावट आहेत आणि एक्झिट पोल भाजपच्या कार्यालयातून आले आहेत," असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, पश्चिम बंगालमधील दोन्ही टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आलेल्या अधिकांश एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर असे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निवडणूक विश्लेषकांनीही सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपमध्ये लढाई अटितटीची असल्याचे म्हटले आहे. खरेतर, पश्चिम बंंगालच्या २९४ जागांसाठी २३ आणि २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जनतेने उस्फूर्त सहभाग घेत विक्रमी मतदान केले. दोन्ही टप्प्यांतील मतदानाचा आकडा ९२ टक्क्यांच्याही वर पोहोचला आहे.

'तृणमूल किती जागा जिंकणार? ममतांची मोठी भविष्यवाणी -  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत 'X' वर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. यात त्यानी या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला किती जागा मिळतील? यासंदर्भात भविष्यवाणी केली आहे. त्या म्हणाल्या, "या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस २२६ हून अधिक जागा जिंकेल." 

महत्वाचे म्हणजे, त्यांनी जाहीर केलेला हा आकडा पक्षाच्या गत २१५ जागांपेक्षाही मोठा आहे. याचवेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचेही आवाहन केले. एवढेच नाही तर, गरज पडल्यास आपण स्वतः ईव्हीएमचे (EVM) राखण करण्यासाठी येऊ," असेही त्यांनी म्हटले आहे.

असे आहेत एक्झिट पोल्सचे अंदाज -'मॅटेराइज'च्या (MATERIZE) एक्झिट पोलनुसार, बंगालमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता असून भाजप सरकार स्थापन करू शकते. भाजपला १४६ ते १६१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तृणमूल काँग्रेसला १२५ ते १४० जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे. तसेच इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, 'पीपुल्स पल्स'ने तृणमूलला १७७ ते १८७ जागांसह बहुमताचा अंदाज दिला आहे. तर 'प्रजा पोल'ने भाजपला १७७ जागा मिळतील असा दावा केला आहे. पी-मार्क या एजन्सीने भाजपला १५० ते १७५ आणि टीएमसीला ११८ ते १३८ जागा मिळतील असे म्हटले आहे. चाणक्य स्ट्रॅटेजिजने देखील भाजपाला कल दिला असून ममतांना १३०-१४० आणि भाजपाला १५०-१६० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee rejects exit polls, predicts TMC victory in West Bengal.

Web Summary : Mamata Banerjee dismissed exit polls, confident of TMC's win exceeding 226 seats. She alleged manipulated figures to demoralize her party workers, urging vigilance during counting, and suggesting EVM monitoring.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस