US-Iran: अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची भूमिका चर्चेत आली आहे. स्वतःला मध्यस्थ म्हणवणाऱ्या पाकवर आता अमेरिकेकडून फसवणूक केल्याचे आरोप होत आहेत. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने इराणला रशिया, चीन आणि इतर देशांसोबत व्यापार सुरू ठेवण्यासाठी जमिनीमार्गे सहा नवीन मार्ग उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेतील सुरक्षा तज्ज्ञ डेरेक जे ग्रोसमन यांनी गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानच्या या कृत्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मॅक्सिमम इकॉनॉमिक प्रेशर’ धोरणाला धक्का बसू शकतो. याद्वारे अमेरिकेने इराणच्या बंदरांवर लादलेल्या निर्बंधांना बगल देत तेहरानला तेल व्यापार सुरू ठेवण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर ग्रॉसमन यांनी पाकिस्तानवर थेट टीका करत पाकने पुन्हा एकदा अमेरिकेसोबत 'डबल गेम' केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, हे मार्ग उघडल्यामुळे इराणला होर्मुझ सामुद्रधुनीवरील अमेरिकन नाकेबंदीचा प्रभाव कमी करता येईल आणि अमेरिकन दबावाला विरोधही सुरू ठेवता येईल.
दरम्यान, पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही. इस्रायलने यापूर्वीच पाकिस्तानच्या मध्यस्थी भूमिकेवर आक्षेप घेतला होता. भारतातील इस्रायलचे राजदूत रेवेन अझर यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, इराणकडूनही पाकिस्तानच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात आली.
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते इब्राहीम रेझाई यांनी पाकिस्तानला मित्र देश मानले असले, तरी तो निष्पक्ष मध्यस्थ नसल्याचे म्हटले. त्यांच्या मते, इस्लामाबादचा कल अमेरिकेच्या हितांकडे अधिक झुकलेला आहे. अमेरिकेने इराणवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी त्यांच्या बंदरांवर नौदलाच्या मदतीने नाकेबंदी लावली आहे. या माध्यमातून तेहरानला अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, पाकिस्तानने इराणसाठी सहा भू-मार्ग खुले केल्याने या रणनीतीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Amid US-Iran tensions, Pakistan, accused of deception, opened six land routes for Iran trade with Russia and China. This move undermines US sanctions, aiding Iran's oil trade, drawing criticism and raising questions about Pakistan's neutrality.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, पाकिस्तान पर धोखे का आरोप है। उसने ईरान को रूस और चीन के साथ व्यापार के लिए छह भूमि मार्ग खोले। इससे अमेरिकी प्रतिबंध कमजोर होंगे और ईरान के तेल व्यापार को मदद मिलेगी, जिसकी आलोचना हो रही है।