शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:21 IST

Oben Rorr Evo Price & Range: १८० किमी रेंज आणि ११० किमी टॉप स्पीड असलेली ओबेन रोर इवो लाँच. ओला रोडस्टर X ला मिळणार मोठी टक्कर.

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये ओला रोडस्टर X ला आव्हान देण्यासाठी 'ओबेन इलेक्ट्रिक'ने आपली नवीन दमदार इलेक्ट्रिक मोटरसायकल 'रोर इवो' लाँच केली आहे. आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्ससह सज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत ९९,९९९ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. ही सवलतीची किंमत पहिल्या १०,००० ग्राहकांसाठीच लागू असेल, त्यानंतर किंमत १.२५ लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे.

स्पोर्टी लूक आणि कलर्स:रोर इवोचे डिझाइन आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक शार्प आणि मॉडर्न आहे. यात सिंगल प्रोजेक्टर हेडलाइट आणि वरच्या बाजूला LED DRL स्ट्रिप देण्यात आली आहे. ही बाईक न्यूट्रॉन ब्लू, पल्स रेड, मॅग्नेटिक ब्लॅक आणि फोटॉन व्हाईट अशा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

बॅटरी आणि रेंजचा धडाका...एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक १८० किमी (IDC रेंज) धावू शकते. यात ३.४ kWh क्षमतेची LFP बॅटरी दिली आहे, जिला IP67 रेटिंग मिळाले असून ती धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फास्ट चार्जरच्या मदतीने ही बाईक केवळ ९० मिनिटांत ८०% पर्यंत चार्ज होते.

वेगवान परफॉर्मन्सरोर इवोमध्ये ९kW ची मोटर असून ती २५०Nm टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे, ओबेनने या बाईकमध्ये पहिल्यांदाच 'चेन ड्राईव्ह' सिस्टिमचा वापर केला आहे. ही बाईक केवळ ३ सेकंदात ० ते ४० किमी/तास वेग पकडते आणि तिचा टॉप स्पीड ११० किमी प्रतितास आहे.

हायटेक फीचर्सबाईकमध्ये ५-इंच TFT कन्सोल देण्यात आला आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. याद्वारे रायडर्सना नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि कॉल/मेसेज अलर्ट्स मिळतात. सुरक्षेसाठी यात अँटी-थेफ्ट अलर्ट, फॉल अलर्ट, रिव्हर्स मोड आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारखे फीचर्स आहेत. तसेच ओबेन ॲपद्वारे जिओ-फेन्सिंग आणि रिमोट ट्रॅकिंगची सुविधाही मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Oben Ror electric bike launched to challenge Ola; priced at ₹99,999.

Web Summary : Oben Electric launched Ror, an electric bike challenging Ola. It boasts 180km range, fast charging, and a 5-inch TFT console with smartphone connectivity. Priced at ₹99,999 for initial buyers.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरmotercycleमोटारसायकल