By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:02 IST
1 / 7मे महिना उजाडला की अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. वाढता पारा, कडक ऊन आणि गरम वारे यामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक थकवाही जाणवू लागतो. अशातच मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेक कुटुंबं थंडाव्याच्या शोधात असतात.2 / 7जर तुम्हालाही या रणरणत्या उन्हापासून सुटका हवी असेल आणि मे महिन्यात डिसेंबरसारखी थंडी अनुभवायची असेल, तर भारतातील काही निवडक ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.3 / 7नैनिताल (उत्तराखंड): नैनिताल हे त्याच्या सुंदर तलावांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या 'नैनी लेक'मध्ये बोटिंग करण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. धार्मिक पर्यटनाची आवड असल्यास तुम्ही नयना देवी मंदिरालाही भेट देऊ शकता. इथले डोंगर आणि शांतता मे महिन्यातील उष्णता विसरायला लावते.4 / 7दार्जिलिंग (पश्चिम बंगाल): चहाचे मळे आणि कांचनगंगा पर्वताचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी दार्जिलिंगला पर्याय नाही. येथील शांत वातावरण आणि 'टॉय ट्रेन'चा प्रवास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ घालतो. इथे तुम्ही पीस पॅगोडा आणि सिंगलीला नॅशनल पार्कलाही भेट देऊ शकता.5 / 7शिलाँग (मेघालय): जर तुम्हाला ईशान्य भारताची सफर करायची असेल, तर शिलाँगला नक्की जा. याला 'पूर्वेकडील स्कॉटलंड' म्हटले जाते. येथील धबधबे आणि दाट हिरवळ तुमच्या मनाला कमालीचा सुकून देईल.6 / 7शिमला (हिमाचल प्रदेश): सिमल्याचे हिरवेगार डोंगर आणि तिथली प्रसन्न हवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे. दिल्लीपासून अवघ्या ६-७ तासांच्या अंतरावर असलेले हे हिल स्टेशन आजही पर्यटकांच्या पसंतीस उतरते. मॉल रोडवर फिरण्याची मजा उन्हाळ्यात काही औरच असते.7 / 7मनाली (हिमाचल प्रदेश): उन्हाळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी मनाली हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. येथील बर्फाच्छादित डोंगर आणि थंड वारे तुमचा सर्व ताण पळवून लावतील. निसर्गसौंदर्यासोबतच तुम्ही इथे पॅराग्लाइडिंग आणि रिव्हर राफ्टिंगसारख्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.