जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर जागतिक बँकेचा ताजा 'कमोडिटी मार्केट आउटलुक' अहवाल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक बँकेच्या मते, २०२६ मध्ये सोन्याच्या किमतीत ३७ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ होऊ शकते. मात्र, या तेजीनंतर लगेचच २०२७ मध्ये सोन्याच्या दरात ८.५ टक्क्यांची मोठी घसरण होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
जागतिक बँकेने या दरवाढीमागे मुख्यत्वे 'भू-राजकीय तणाव' हे कारण दिले आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. जेव्हा जगात युद्धाची स्थिती असते, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात.
अपेक्षित दर२०२६ मध्ये सोन्याचा सरासरी दर ४,७०० डॉलर प्रति औंस (भारतीय चलनात सुमारे १.४४ लाख रुपये प्रति १० ग्रॅम) पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
होर्मुजची सामुद्रधुनी आणि पुरवठा साखळीमध्य-पूर्वेतील युद्ध आणि 'होर्मुजच्या सामुद्रधुनी'तून होणारी विस्कळीत वाहतूक हे दरवाढीचे मुख्य कारण आहे. जागतिक बँकेच्या मते, जर मे महिन्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली, तर वर्षाच्या शेवटी परिस्थिती सामान्य होऊ शकते.
२०२७ मध्ये भाव का कोसळणार?अहवालानुसार, २०२७ मध्ये सोन्याचा दर ४,३०० डॉलर प्रति औंस (सुमारे १.३१ लाख रुपये प्रति १० ग्रॅम) पर्यंत खाली येऊ शकतो. जर जागतिक अर्थव्यवस्थांमधील महागाई आटोक्यात आली आणि बँकांनी व्याजदरात वाढ केली, तर सोन्यातील गुंतवणूक कमी होऊन किमतीत ८.५% घट होऊ शकते.
आजचे ताजी स्थिती (MCX)जागतिक बँकेचा अहवाल आल्यानंतर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. घरगुती बाजारपेठेत (MCX) जूनचा वायदा १.५३% वाढून १,५१,३३७ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यापार करत आहे.
Web Summary : World Bank forecasts a 37% gold price surge by 2026 due to geopolitical tensions, potentially reaching $4,700 per ounce. However, a 8.5% drop is expected in 2027 if inflation cools and interest rates rise.
Web Summary : विश्व बैंक के अनुसार, भू-राजनीतिक तनाव के कारण 2026 तक सोने की कीमतों में 37% की वृद्धि हो सकती है, जो 4,700 डॉलर प्रति औंस तक पहुंच सकती है। हालांकि, 2027 में मुद्रास्फीति कम होने और ब्याज दरें बढ़ने पर 8.5% की गिरावट की उम्मीद है।