शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:06 IST

Axis My India Bengal Exit Poll : प्रदीप गुप्ता (Axis My India) यांनी बंगालचा एक्झिट पोल जाहीर केला नाही. ९२.४७% विक्रमी मतदानामुळे निकालाचा सस्पेन्स वाढला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच, एक्झिट पोलच्या विश्वात एक मोठी खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह मानली जाणारी निवडणूक संस्था 'ॲक्सिस माय इंडिया' ने बंगालचा एक्झिट पोल जाहीर न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मतदारांच्या अनाकलनीय शांततेमुळे अचूक आकडेवारी देणे अशक्य असल्याचे सांगत एजन्सीने हा मोठा निर्णय घेतला आहे.Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!

'ॲक्सिस माय इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांनी सांगितले की, सर्व्हे दरम्यान सुमारे ६० ते ७० टक्के मतदारांनी आपली पसंती उघड करण्यास नकार दिला. "जेव्हा जनता उघडपणे बोलत नाही, तेव्हा कोणतेही आकडे देणे चुकीचे ठरेल. चुकीच्या आकड्यांमुळे संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते, त्यामुळे आम्ही डेटा रोखण्याचा निर्णय घेतला," असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

विक्रमी मतदानाचा सस्पेन्स वाढलादुसऱ्या टप्प्यात ९१.६६% आणि पहिल्या टप्प्यात ९३.१९% अशा विक्रमी मतदानामुळे आधीच सस्पेन्स वाढला आहे. दोन्ही टप्प्यांचे सरासरी मतदान ९२.४७% झाले असून, २०११ चा ८४.७२% मतदानाचा विक्रमही मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांनी (९२.८%) पुरुषांपेक्षा (९१.०७%) अधिक उत्साहाने मतदान केले आहे.

इतर एजन्सींचे काय आहेत अंदाज?प्रदीप गुप्तांनी माघार घेतली असली तरी, इतर संस्थांनी आपले अंदाज जाहीर केले आहेत, ज्यात मोठी तफावत दिसत आहे.

जनमत सर्व्हे: टीएमसी १९५-२०५ (बहुमत), भाजप ८०-९० जागा.

प्रजा पोल: भाजप १७८-२०८ (बहुमत), टीएमसी ८५-११० जागा.

NDTV पोल ऑफ पोल्स: भाजप १३७, टीएमसी १५१ (कांटे की टक्कर).

English
हिंदी सारांश
Web Title : Big Twist: Axis My India Refuses West Bengal Exit Poll

Web Summary : Axis My India declined to release West Bengal's exit poll, citing voter silence. High voter turnout adds suspense. Other agencies predict varied outcomes, showing significant differences in seat projections for TMC and BJP.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026west bengalपश्चिम बंगालAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा