शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 06:00 IST

शुक्रे आयोग नेमून त्यांनी मागील १६ वर्षांचा मराठा समाजाचा आढावा घेतला आणि त्यात त्यांना मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष काढला, असा युक्तिवाद साठे यांनी केला.

मुंबई - राज्यात मराठा समाज मोठा असून प्रभावशाली आहे. तसेच त्यांच्या हातात सत्ता आहे. शिक्षण संस्था आणि साखर कारखानेही त्यांच्या हातात असले तरी काही मूठभर लोकांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारता येणार नाही. त्यांना ‘क्रिमिलेयर’ मध्ये समाविष्ट करून आरक्षणाचे फायदे नाकारण्यात येतील, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता  मिलिंद साठे यांनी  गुरुवारी उच्च न्यायालयात केला.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या तर काही आरक्षणाच्या समर्थन करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. न्या. रवींद्र घुगे, न्या. एन. जमादार व न्या. संदीप मारणे यांच्या पूर्णपीठापुढे या याचिकांवर सुनावणी होती. राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला.

युक्तिवाद काय ?राज्यघटनेतील दुरुस्तीमुळे राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. गायकवाड आयोग अयोग्य ठरवल्याने राज्य सरकारला पुन्हा एकदा सर्व परिस्थितीचा आढावा घेणे कायद्याने बंधनकारक होते. त्यामुळे शुक्रे आयोग नेमून त्यांनी मागील १६ वर्षांचा मराठा समाजाचा आढावा घेतला आणि त्यात त्यांना मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष काढला, असा युक्तिवाद साठे यांनी केला.

राज्य निर्मितीपूर्वी दिलेले आरक्षण कसे काढणार?राज्याला मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री मिळाले. मराठा समाजातील लोकांच्या हातात सत्ता आहे. शिक्षण संस्था, साखर काराखान्यांवर याच समाजाचे वर्चस्व आहे, असा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आहे. मुळातच, राज्याच्या निर्मितीआधी ज्या समाजाला मागास म्हणून आरक्षण देण्यात आले होते, ते कसे काढता येणार? काही लोकांमुळे संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण नाकारता येणार नाही. साखर कारखाने, शिक्षण संस्था असलेल्या लोकांना ‘क्रिमिलेयर’मध्ये समाविष्ट करून त्यांना आरक्षणाचे फायदे देणार नाही, असे साठे यांनी स्पष्ट केले. ॲड. साठे यांचा युक्तिवाद पूर्ण झाला नसल्याने पुढील सुनावणी जूनमध्ये ठेवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Denying Maratha Reservation Due to Few Unfair: State Argues in HC

Web Summary : Maharashtra government argues denying Maratha reservation due to few is unjust. State has right to provide reservation. Shukre panel found Marathas backward. 'Creamy layer' will exclude affluent from benefits.
टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय