भारतात सध्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलचा धुमधडाका सुरू आहे. तर दुसरीकडे शेजारी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणारी पीएसएल अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यावर्षी ही स्पर्धा सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या वादात सापडली आहे. यादरम्यान, आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून रमीझ राजा याने कॉमेंट्री बॉक्समध्ये केलेल्या एका कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पीएसएलमधील एका सामन्यादरम्यान, रमीझ राजा आस्ट्रेलियाचा माणि ऑजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकर समालोचन करत होत्या. त्याचवेळी रमीझ राजा हे लीसा स्थळेकर हिची गळाभेट घेऊन चुंबन घेतल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून नेटिझन्सकडून रमिझ राजा याला ट्रोल केलं जात आहे.
पीएसएलचा यंदाचा हंगाम तसा खूप वादग्रस्त ठरला आहे. लिसा स्थळेकरचं चुंबन घेण्यापूर्वी रमिझ राजा यांनी एका सामन्यात समालोचनादरम्यान गडबड केली होती. त्यावेळी त्यांनी क्षेत्ररक्षकाने टिपलेल्या एका झेलाचा उल्लेख कॅच ऑफ द आयपीएल असा केला होता. त्यावरूनही रमिझ राजा याला खूप ट्रोल केलं गेलं होतं. त्यानंतर रमिझ राजानं आपली चूक लगेच सुधारली होती.
रमीझ राजाने चुंबन घेतलेली लिसा स्थळेकर ही भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. तिने ८ कसोटी १२५ एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. दरम्यान, अनेक वादविवादांनी गाजलेल्या पीएसएलचा अंतिम सामना ३ मे रोजी खेळला जाणार आहे. कराची किंग्स हा संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर इस्लामाबाद युनायटेड आणि हैदराबाद किंग्समेन यांच्यात आज होणाऱ्या एलिमिनेटर-२ मधील विजेता संघ अंतिम लढतीत कराची किंग्सशी भिडणार आहे.
Web Summary : Ramiz Raja sparked controversy after a video surfaced showing him kissing commentator Lisa Sthalekar during a PSL match. This incident, along with previous blunders, has led to significant criticism online. The PSL final is scheduled for May 3rd.
Web Summary : पीएसएल मैच के दौरान रमीज राजा द्वारा कमेंटेटर लिसा स्थालेकर को चुंबन करने का वीडियो सामने आने के बाद विवाद खड़ा हो गया। इस घटना और पिछली गलतियों के कारण ऑनलाइन आलोचना हो रही है। पीएसएल फाइनल 3 मई को है।