शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:28 IST

Delhi Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत.

दिल्ली लाल किल्ला स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्यावरील स्फोट हा सामान्य स्फोट नव्हता तर एक मोठा बॉम्बस्फोट होता. स्फोटाचा परिणाम २०० मीटरपर्यंत दिसला. सुरुवातीच्या तपासात ही एक मोठी दहशतवादी घटना असल्याचं दिसून येतं आहे

स्फोट झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले उपेंद्र म्हणाले की, "माझी लोडिंगची एक गाडी होती, जी अजूनही स्फोट झाला त्याच्या अगदी समोर उभी आहे. तिचं सर्व काही तुटलेलं आहे, मोठं नुकसान झालं. कारण आमच्या मागे असलेल्या कारमध्ये स्फोट झाला... नेमकं काय झालं माहित नाही. आम्ही गेट उघडलं आणि लगेच पळत सुटलो. बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आला, आग लागली."

दिल्ली स्फोटाशी संबंधित महत्त्वाच्या माहितीवरून असं दिसून येतं की, हा स्फोट एका I-20 कारमध्ये झाला होता, ज्यामध्ये इतर अनेक प्रवासी देखील होते. हा स्फोट कारच्या मागील बाजूस झाला. स्फोटानंतर घटनास्थळी कोणताही खड्डा नव्हता. कोणत्याही जखमींच्या मृतदेहावर खिळे किंवा तारा नव्हत्या. जखमींचे चेहरे किंवा स्फोटामुळे शरीर काळे झालेले नाही आणि मृतांचेही नाही.

विशेष सेल टीम फॉरेन्सिक तज्ञांसह स्फोट झालेल्या वाहनाच्या तुटलेल्या भागांवरून वाहनाचा नंबर ओळखण्याचं काम करत आहे. दिल्ली स्फोटानंतर, घटनास्थळ सील करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकासह NIA, NSG आणि इतर एजन्सी तपासात सहभागी झाल्या आहेत. घटनास्थळी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. याच दरम्यान, स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी LNJP येथे आणले जात आहे, स्फोटानंतर, अलर्ट जारी करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Survivor recounts escape; eight dead in Red Fort explosion.

Web Summary : Delhi's Red Fort blast killed eight. A witness escaped after a car explosion. Investigation ongoing, agencies involved. Alert issued, injured taken to LNJP.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटcarकारPoliceपोलिसDeathमृत्यू