शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:01 IST

भारताच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व परिस्थितीत तयार राहण्याच्या सूचनाही सैन्याला दिल्या आहेत.

इस्लामाबाद - दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाला, त्यामुळे भारतात पुन्हा एकदा आक्रोश पसरला आहे. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून इतर जण जखमी आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी या स्फोटाचा तपास सुरू केला असून त्यामागे कुणाचा हात आहे हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र भारतातील या स्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री असीम मुनीर यांनी सैन्याला अलर्ट केले आहे. दिल्लीतील स्फोटानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरसारख्या कारवाईची धडकी पाकिस्तानच्या मनात बसली आहे.

दिल्लीच्या स्फोटानंतर पाकिस्तानने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला अलर्ट केले आहे. पाकिस्तानने सर्व विमानतळे आणि एअरफिल्डला रेड अलर्ट जारी केला आहे. भारताकडून लष्करी कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तानने सीमेवरील सुरक्षाही वाढवली आहे. सूत्रांनुसार, पाकिस्तानने लष्कर, वायूदल आणि नौदलासह सशस्त्र दलांना हायअलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानी उच्चाधिकारी सर्व घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवत आहेत. 

पाकिस्तानी वायू सेनेने एअर डिफेन्स सक्रिय करण्यासोबतच महत्त्वाच्या ठिकाणांहून विमान तातडीने उड्डाण करण्याची तयारी ठेवली आहे. ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी एअरमॅन नोटीस (NOTAM) जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे सीमा भागात आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी तणावपूर्ण सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय भारताच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व परिस्थितीत तयार राहण्याच्या सूचनाही सैन्याला दिल्या आहेत. CNN ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानला कुठली भीती सतावतेय?

भारतात होणाऱ्या कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे सामन्यत:  पाकिस्तानशी जोडले जातात. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असण्याच्या अँगलने तपास केला जात आहे. याआधी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केले होते. त्याचाच बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून तिथे दहशतवाद्यांना टार्गेट केले होते. त्यात जैश ए मोहम्मदचं मुख्यालयही उडवून लावले होते. त्यानतंर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. या दोन्ही देशात सीजफायर करताना यापुढे जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast Triggers Pakistan's Fear; Emergency Meeting, NOTAM Issued

Web Summary : Delhi blast alarms Pakistan, prompting high alert. Airports on red alert, border security heightened amid fears of Indian retaliation. NOTAM issued, military on standby.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतBlastस्फोट