शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 04:24 IST

Delhi blast Update: लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून, त्यात आय २० कारमध्ये स्फोटके लावून आत्मघाती हल्ल्याच्या पद्धतीने स्फोट करण्यात आला, असा गुप्तचर संस्थांना संशय आहे.

राजधानी दिल्लीत झालेल्या आणि संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या स्फोटाप्रकरणी सुरू असलेल्या तपासामधून आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून, त्यात आय २० कारमध्ये स्फोटके लावून आत्मघाती हल्ल्याच्या पद्धतीने स्फोट करण्यात आला, असा गुप्तचर संस्थांना संशय आहे. लाल किल्ल्याजवळील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० जण जखमी झाले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या कार स्फोट प्रकरणी यूएपीएच्या कलम १६ आणि १८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय स्फोटक पदार्थ अधियम कलम ३ आणि ४ सुद्धा जोडण्यात आले आहे.

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. त्यामधून हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असण्याचे संकेत मिळत आहेत. ही कार गुरुग्राम उत्तर आरटीओमध्ये नोंदणी केलेली होती. तिचा क्रमांक एचआर २६, ७६२४ होता. ही कार मोहम्मद सलमान याच्या नावावर होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. या चौकशीत सलमान याने ही कार जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील तारिक नावाच्या एका व्यक्तीला विकल्याचे सांगितले आहे. दरम्यान, यात कारवर १५ सप्टेंबर रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, तारिक याला जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात  घेतले आहे.

एवढंच नाही तर आतापर्यंतच्या तपासामधून लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटाचे धागेदोरे हे ९ नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आलेल्या फरिदाबाद टेरर मॉड्युलशी जुळत असल्याचे संकेत मिळत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले आहेत. दरम्यान, ज्या आय२० कारमध्ये स्फोट झाला, त्या कारमध्ये दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद होता, असा गुप्तचर संस्थांचा संशय आहे. फरिदाबाब टेकर मॉ़ड्युलमधील प्रमुख सदस्य अशलेला उमर मोहम्मद हा फरार होता. आता पोलिसांनी कारमधील मृतांची डीएनए चाचणी करणार असून, त्यामधून या कारमध्ये उमर मोहम्मद होती की नाही हे स्पष्ट होणार आहे. कामध्ये आणखी तिघे संशयित होते, अशीही माहिती मिळत आहे. तसेच त्यांचीही ओळख पटवण्याचे प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोट झालेल्या परिसरामधील आजूबाजूच्या ठिकाणी सीसीटीव्ही तपासले असता संबंधित आय२० कारबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कार १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी लाल  किल्ल्याजवळच्या मुघलकालीन सुनहरी मशीद येथील पार्किंगमध्ये आली. त्यानंतर सुमारे तीन तास तिथेच थांबली. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी निघाली आणि ४ मिनिटांतच स्फोट झाला. दरम्यान, ही कार थांबलेली असताना तिच्यात स्फोटके लावण्यात आली असावीत असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Suicide Attack? Police Investigate Car Explosion Near Red Fort

Web Summary : Delhi blast near Red Fort may be a terror attack. Car used was registered in Gurugram, sold to a Pulwama resident. Police suspect links to Faridabad terror module and are investigating further. DNA testing underway.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाBlastस्फोट