शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra School: सीबीएसई शाळा ९ जूनपासून तर राज्य मंडळाच्या शाळा १६ जूनपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:19 IST

नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये उत्साहाचे वातावरण; पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये तयारीला वेग

पुणे : राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार असून, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई) शाळा ९ जून पासून सुरू होणार आहेत. तर राज्य मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा १६ जून पासून सुरू होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेच्या वातावरणात परतण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे. पालकही मुलांच्या शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यात गुंतले आहेत.

राज्यातील विविध भागांतील हवामान व उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये फरक ठेवण्यात आला आहे. सीबीएसईच्या शाळा बहुतेक शहरी भागात असतात आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होते. राज्य मंडळाच्या शाळा मुख्यतः ग्रामीण भागात आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे त्या थोड्या उशिराने सुरू होणार आहेत.दरम्यान, अनेक शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम, उपक्रम व तांत्रिक सुविधा लागू करण्याचे काम देखील चालू आहे. काही शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल अभ्यासक्रम, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.या वर्षीपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत काही नव्या सुधारणा लागू करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक नव्या पद्धतीच्या शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.

सीबीएसईच्या शाळचे नवीन शैक्षणिक वर्ष एक एप्रिल पासूनच सुरु झाले आहे.मात्र उन्हाळी सुट्टीच्या ब्रेक नंतर आता पहिली ते दहावीचे वर्ग ९ जूनपासून सुरु होणार आहे.विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक वर्गाची तयारी पूर्ण झाली आहे. -कविता वानखेडे ,मुख्याध्यापक सरहद स्कूल

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळा १६ जून सोमवारी सुरू होणार. सदर शैक्षणिक वर्षांमध्ये प्रथम सत्र सोमवार १६ जून ते गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२५असे राहील.- शिवाजी शिंदे, अध्यक्ष पुणे शहर मुख्याध्यापक संघ

शाळा १६ जूनपासून सुरु होणार आहे.त्यामुळे शाळेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.मुलांमध्ये ही उत्साह दिसत आहे.- अलका साळुंखे,पालक

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र