आर्थिक फसवणूक केल्याने उद्योजकाने उचलले टोकाचे पाऊल; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:17 IST2026-05-19T17:17:14+5:302026-05-19T17:17:31+5:30

आपटे रस्ता परिसरातील एका तारांकित हाॅटेलमध्ये त्यांनी १० मे रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता

Businessman takes extreme step after being accused of financial fraud; Case registered against four | आर्थिक फसवणूक केल्याने उद्योजकाने उचलले टोकाचे पाऊल; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक केल्याने उद्योजकाने उचलले टोकाचे पाऊल; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील एका तारांकित हाॅटेलमध्ये आत्महत्या केलेल्या उद्योजकाची आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मोहित अशोक जैन (वय ३२, रा. मीनाक्षी सोसायटी, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नथुसिंह राजपुरोहित, सतीश राजपुरोहित, भगवान राजपुरोहित, प्रल्हाद चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे उद्योजक होते. आपटे रस्ता परिसरातील एका तारांकित हाॅटेलमध्ये त्यांनी १० मे रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. जैन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली होती. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. आरोपींनी जैन यांची आर्थिक फसवणूक केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे मोहित जैन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक भोसले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title : आर्थिक धोखाधड़ी के बाद व्यवसायी ने की आत्महत्या; चार के खिलाफ मामला दर्ज

Web Summary : पुणे के एक व्यवसायी ने आर्थिक धोखाधड़ी के कारण आत्महत्या कर ली। पुलिस ने एक सुसाइड नोट के बाद चार लोगों के खिलाफ मामला दर्ज किया। जांच जारी है।

Web Title : Businessman Commits Suicide After Financial Fraud; Four Booked

Web Summary : Pune businessman committed suicide due to financial fraud. Police filed a case against four individuals following a suicide note implicating them. Investigation is ongoing.