सावधान! लोणावळ्यात व्हिला बुकिंग स्कॅम; पर्यटकांची हजारोंनी फसवणूक, प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:46 IST2026-04-22T12:46:17+5:302026-04-22T12:46:44+5:30

गेल्या काही दिवसांपासून आकर्षक फोटो, कमी दर आणि आकर्षक ऑफर्स दाखवून पर्यटकांना आमिष दाखवले जात आहे.

Beware! Villa booking scam in Lonavala; Thousands of tourists cheated, expect action from the administration | सावधान! लोणावळ्यात व्हिला बुकिंग स्कॅम; पर्यटकांची हजारोंनी फसवणूक, प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

सावधान! लोणावळ्यात व्हिला बुकिंग स्कॅम; पर्यटकांची हजारोंनी फसवणूक, प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

लोणावळा : पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असून पर्यटकांना लक्ष्य केले जात आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येत असतात. याचाच फायदा घेत काही भामटे सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट व्हिला व बंगल्यांच्या बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांना गंडा घालत असल्याचे उघड झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आकर्षक फोटो, कमी दर आणि आकर्षक ऑफर्स दाखवून पर्यटकांना आमिष दाखवले जात आहे. बुकिंग निश्चित करण्याच्या नावाखाली २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते. विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशनही पाठवले जाते. मात्र प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यानंतर दिलेल्या ठिकाणी कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे समोर येते. त्यामुळे अनेक पर्यटक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत. या वाढत्या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटन व्यवसायावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. एकूणच, वाढत्या ऑनलाइन फसवणुकीमुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सतर्कता अत्यावश्यक बनली असून प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हे स्कॅम लोणावळ्यातील नसून बाहेरील भामट्यांकडून राबवले जात आहेत. त्यामुळे पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग करताना विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. – नासिर शेख (स्थानिक व्यावसायिक)

माझ्यासोबतही असा प्रकार झाला आहे. त्यामुळे इतरांनी सावध राहावे आणि आधी खात्री करूनच पैसे भरावेत. पर्यटकांनी शक्यतो अधिकृत वेबसाईट किंवा विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरूनच बुकिंग करावे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक ऑफरवर विश्वास ठेवू नये. -एक पर्यटक

 

Web Title : लोनावला विला बुकिंग घोटाला: पर्यटक ठगे, कार्रवाई की उम्मीद!

Web Summary : लोनावला में सोशल मीडिया पर विला बुकिंग घोटाले पर्यटकों को निशाना बना रहे हैं। पीड़ितों को आकर्षक सौदों का लालच दिया जाता है, वे अग्रिम भुगतान करते हैं, और पाते हैं कि संपत्ति मौजूद ही नहीं है। स्थानीय लोग सावधानी बरतने और पर्यटन की रक्षा के लिए अधिकारियों से कार्रवाई की मांग करते हैं।

Web Title : Lonavala Villa Booking Scam: Tourists Defrauded, Action Expected!

Web Summary : Tourists in Lonavala are being targeted by villa booking scams on social media. Victims are lured with attractive deals, pay upfront, and discover the property doesn't exist. Locals urge caution and demand action from authorities to protect tourism.