सुट्ट्या पैशावरून आईस्क्रीम विक्रेत्यासोबत वाद; रस्त्यावर जोरात ढकलून दिल्याने तरुणाचा मृत्यू, इंदापूरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:31 IST2026-05-04T16:31:35+5:302026-05-04T16:31:49+5:30

रस्त्यावर जोरात ढकलल्यानंतर तरुणाच्या डोक्याला डांबरी रस्त्यावर आपटल्याने गंभीर दुखापत झाली, त्यातच त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला

Argument with ice cream vendor over vacation money; Youth dies after being pushed on the road, incident in Indapur | सुट्ट्या पैशावरून आईस्क्रीम विक्रेत्यासोबत वाद; रस्त्यावर जोरात ढकलून दिल्याने तरुणाचा मृत्यू, इंदापूरातील घटना

सुट्ट्या पैशावरून आईस्क्रीम विक्रेत्यासोबत वाद; रस्त्यावर जोरात ढकलून दिल्याने तरुणाचा मृत्यू, इंदापूरातील घटना

कुरवली : उद्धट (ता. इंदापूर) येथील उदमाईदेवी यात्रेत सुट्ट्या पैशांच्या किरकोळ वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १) रात्री उशिरा घडली. या प्रकरणी आईस्क्रीम गाडी चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा रावण इंगळे (वय २३, रा. उद्धट, ता. इंदापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर किसन शंकरलाल प्रजापती (सध्या रा. बरड, ता. फलटण, जि. सातारा; मूळ रा. राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुरज हिंमत तुपे (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उदमाईदेवी यात्रेनिमित्त ते आणि त्यांचा मित्र दादा इंगळे हे मंदिर परिसरात फिरत होते. यावेळी उदमाई मॉलसमोरील भैरवनाथ आईस्क्रीम गाडीवर फालुदा खाण्यासाठी गेले असता, सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून विक्रेत्यासोबत वाद झाला. हा वाद चिघळल्याने संशयित आरोपी प्रजापती याने दादा इंगळे याला शिवीगाळ करत जोरात ढकलून दिल्याचा आरोप आहे. या धक्क्यामुळे इंगळे रस्त्यावर पडला आणि त्याच्या डोक्याला डांबरी रस्त्यावर आपटल्याने गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे करत आहेत.

Web Title : खुल्ले पैसे पर विवाद में युवक की मौत, इंदापुर की घटना

Web Summary : इंदापुर में खुले पैसे को लेकर आइसक्रीम विक्रेता से विवाद में 23 वर्षीय युवक की मौत हो गई। विक्रेता ने कथित तौर पर उसे धक्का दिया, जिससे सिर में घातक चोट आई। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।

Web Title : Argument over change leads to death in Indapur.

Web Summary : A 23-year-old died after an argument over small change with an ice cream vendor in Indapur. The vendor allegedly pushed him, causing a fatal head injury. Police have registered a murder case and are investigating.