शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या नीळकंठेश्वरला २० तर सहकार बचावला १ जागा, जाणून घ्या पॅनल अन् उमेदवारांची मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:33 IST

शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले असून या गटाला एकही जागा मिळालेली नाही

माळेगाव: माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनलने २० जागा जिंकत नेतृत्वाचा करिश्मा सिद्ध केला. तर गुरू-शिष्यांच्या सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले. या गटाला एकही जागा मिळालेली नाही.

उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘ब’ वर्गातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून स्वतःचेच नाव चेअरमन पदासाठी घोषित केले. त्यामुळे या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले. अजित पवार यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेत स्वत:ची रणनीती आखली. सलग आठ ते दहा दिवस कारखाना कार्यक्षेत्रात तळ ठोकत सभासदांच्या गाठीभेटी घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच दहा ते बारा सभा घेऊन विरोधकांच्या आरोपांना तितक्याच तत्परतेने उत्तर देत निवडणुकीची हवा व निकाल आपल्या बाजूने वळवण्यात पवार यांनी यश मिळविले.

या निवडणुकीत अजित पवार यांनी अत्यंत प्रभावी आणि आक्रमक प्रचार केला. आपल्या भाषणात त्यांनी सलग पाच वर्षे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार, निवडून येणाऱ्या संचालकांना कोणतेही वाहन अथवा ड्रायव्हर मिळणार नाही, संचालकांना भत्ता मिळणार नाही, त्यांना फक्त चहा मिळणार, कारखान्याला राज्याचा व केंद्राचा निधी मिळवून देणार, कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते एस.आर.एस फंडातून करणार. रस्ते करण्यासाठी सभासदांचा एकही रुपया घेतला जाणार नाही, केंद्र व राज्याचा विविध निधी कारखान्याला आणण्यासाठी मदत करणार, संचालकाला कारखान्यातून एकही रुपयाचा उचल मिळणार नसल्याची भर सभेत घोषणा केली. अजित पवार यांच्या या घोषणांनी सभासदांमध्ये एक वादळ निर्माण झाले. सभासदांनी देखील अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने पॅनल विजयी केले.

बैठकीला उपस्थित नसल्याचा मुद्दा ठरला प्रभावी

मागील निवडणुकीत विरोधकांचे चार संचालक निवडून आलेले होते. त्यामध्ये स्वतः सहकारमहर्षी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यासह ॲड. जी. बी. गावडे व प्रताप आटोळे यांचा समावेश होता. त्यानंतर प्रताप आटोळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. उर्वरित तीन संचालक कारखान्याच्या अनेक बोर्ड मीटिंगला हजर राहिले नाहीत, सभासदांची बाजू उचलून धरली नाही, कामगारांचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच मिटवण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री पवार यांनी सभेत उचलून धरले. त्यातूनच विरोधी वातावरण निर्माण करण्यात पवार यांना यश आले. परिणामी विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मानले जाते.

शरद पवार गटाला हजारच्या आत मते

शरद पवार गटाने सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केले होते. त्यांच्या उमेदवारांनी साधारणपणे ५०० ते १००० मते घेतली. त्यांच्या उमेदवारांचा आणि मतांचा कुठलाही परिणाम अजित पवार यांच्या पॅनलवर झालेला नसल्याचे आजच्या निकालाने अधोरेखित झाले.

पॅनल आणि उमेदवार, उमेदवारांना मिळालेली मते

नीळकंठेश्वर पॅनल (अजित पवार गट)

सर्वसाधारण गट क्रमांक १ माळेगाव
शिवराज राजे जाधवराव ८,६१२
राजेंद्र बुरुंगले ८,११६
बाळासाहेब तावरे ७,९४६

सर्वसाधारण गट क्रमांक २ पणदरे

योगेश जगताप ८,६३५
तानाजी कोकरे ८,४९५
स्वप्नील जगताप ७,९३३

सर्वसाधारण गट क्र. ३ सांगवी कांबळेश्वर

गणपत खलाटे ८,५४३
विजय तावरे ७,८८२
विरेंद्र तावरे ७,२८९ (पराभूत)

सर्वाधारण गट क्रमांक ४ खांडज शिरवली

सतीश फाळके ८,४०४
प्रताप आटाेळे ८,३२८

सर्वसाधारण गट क्रमांक ५ निरा वागज मेखळी

अविनाश देवकाते ८,६४०
जयपाल देवकाते ८,०५१

‘ब’ वर्ग

अजित पवार ९१

महिला प्रतिनिधी

संगीता कोकरे ८,४४०
ज्योती मुलमुले ७,५७६

अनुसूचित जाती जमाती

रतनकुमार भोसले ८,६७०

इतर मागास प्रवर्ग

नितीन शेंडे ८,४९४

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग

विलास देवकाते ८,७९२

सहकार बचाव शेतकरी पॅनल (तावरे गट)

गट क्रमांक १ माळेगाव

रंजनकुमार तावरे ७,३५३
संग्राम काटे ६,७०१
रमेश गोफणे ६,३०२

गट क्रमांक २ पणदरे

सत्यजीत जगताप ६,२३२
रणजीत जगताप ६,१३४
रोहन कोकरे ७,०८३

गट क्र. ३ सांगवी कांबळेश्वर

चंद्रराव तावरे ८,१६३ (विजयी)
रणजीत खलाटे ७,२२४
संजय खलाटे ६,१५४

गट क्रमांक ४ खांडज शिरवली

विलास सस्ते ६,४३६
मेघश्याम पोंदकुले ६,४२२

गट क्रमांक ५ निरावागज मेखळी

राजेश देवकाते ६,४९९
केशव देवकाते ६,४३६

‘ब’ वर्ग

भालचंद्र देवकाते १०

महिला प्रतिनिधी

राजश्री कोकरे ७,४८५

अनुसूचित जाती जमाती

बापुराव गायकवाड ७,१८३

इतर मागास प्रवर्ग

रामचंद्र नाळे ७,३४१

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास

सुर्याजी देवकाते ६,५७२

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस