शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:46 IST

भाजपची आगपाखड; शिंदेसेनेने आरोप फेटाळले, एमआयएमलाही चांगला निधी दिल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : मुंबई पालिकेत ठराविक नगरसेवकांनाच कोट्यवधींचा निधी दिल्यावरून वाद सुरू असताना ठाण्यात सत्तेत असून, तीन महासभेत मंजूर  कामांमध्ये केवळ १० टक्केच निधी मिळाल्याची आगपाखड भाजपने केली आहे. शिंदेसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांसाठी १५४.३० कोटींचा निधी मंजूर केला , तसेच विरोधी बाकावरील दोन्ही राष्ट्रवादींसह एमआयएमलाही चांगला निधी दिल्याचा दावा भाजपचा आहे. परंतु शिंदेसेनेने आरोप फेटाळला आहे.

 ठामपाच्या निधी वाटपाची आकडेवारी भाजपने समोर आणली. नुकत्याच झालेल्या महासभेतही ४३२ कोटींचे विषय मंजूर केल्याचा दावा भाजपचा आहे. यात ७० टक्के प्रस्ताव हे शिंदेसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील असून,  ३० ते ३२ कोटींची कामे विरोधी पक्षनेत्याच्या प्रभागासाठी मंजूर केल्याचा आरोपही भाजपचा आहे. भाजपच्या ५ प्रभागांसाठी केवळ ३.०५ कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजूर केला. दोन्ही राष्ट्रवादी, एमआयएमच्या प्रभागासाठी ४.४५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 

मागील तीन महासभेत शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र सत्तेत सोबत असतानाही आमच्या वाटेला केवळ ३.०५ कोटींचाच निधी देण्यात आला आहे. त्यातही मे महिन्यात झालेल्या महासभेत ४३२ कोटींच्या कामांच्या निधीमध्ये ७० टक्के निधी शिंदेसेनेच्याच नगरसेवकांना दिला आहे. त्यामुळे हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.
-कृष्णा पाटील, उपमहापौर, ठाणे

महासभेत आलेले प्रस्ताव हे प्रशासनाकडून आणण्यात आलेले असतात. त्यानंतर त्यावर महापौरांकडून चर्चा होते. अखेर गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर अंतिम चर्चा होऊन महासभेत ते विषय मंजुरीसाठी आणले जातात. त्यामुळे सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.
हणमंत जगदाळे, सभागृह नेते, ठाणे महापालिका

विरोधी पक्षनेत्याला दीड कोटींचा निधी
दोन्ही राष्ट्रवादीसह एमआयएमला ४ कोटी ४५ लाखांचा निधी मिळाला आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या प्रभाग क्रमांक १० ला २ कोटी, राष्ट्रवादी (शरद पवार)चे नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या प्रभाग क्रमांक ३२ ला १.५ कोटी, प्रभाग क्रमांक २६ ला ७० लाख, एमआयएमचे नगरसेवक असलेल्या प्रभाग क्रमांक ३० ला १३ लाख आणि प्रभाग क्रमांक ३३ ला १२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

शिंदेसेनेच्या नगरसेवकांना निधी
    प्र. क्र.     निधी (कोटी)
    १५    १५.५२
    २०     १४.०५
    २२     १३.३३ 
    १९     १३.२६ 
    २८         १२ 
    १         ११ 
    १६         ७.३९ 
    ६         ६.५ 
    १२ व १७         ५ (प्रत्येकी) 
    ७         ४.२७ 
    २४         ३.५७ 
    १८         २.६५ 
    ९         २.५ 
    ३         २ 
    ८         १.६० 
    २७         ७५ लाख
    १४, २५, २९     ५० लाख (प्रत्येकी)
    १३         ११ लाख
    ३१         ३ लाख

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा