लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पेट्रोल-डिझेलनंतर आता वाढत्या उत्पादन खर्चाचा फटका सर्वसामान्यांच्या दैनंदिन खाद्यपदार्थांनाही बसू लागला आहे. मुंबईमध्ये काही किरकोळ दुकानदारांनी पाव, ब्रेड आणि खारीच्या किमतींत सुमारे १० टक्क्यांनी वाढ केली आहे.
मैदा, तेल, लोणी, गॅस, वीज आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ लक्षात घेता बेकरी व्यावसायिकांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चहा-पाव, वडापाव, सँडविच आणि नाश्त्यासाठी ब्रेडवर अवलंबून असलेल्या ग्राहकांच्या खिशाला अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
मुंबईतील अनेक छोट्या बेकऱ्यांनी नव्या दरांची अंमलबजावणी सुरू केली आहे. यानुसार, पूर्वी साधारण १८ रुपयांत आठ पावांची एक लादी मिळत होती.
कच्च्या मालाचे दर वाढल्याचा फटका
खारी, टोस्ट आणि इतर बेकरी पदार्थांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. बेकरी चालकांच्या मते, कच्च्या मालाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. खाद्यतेल, बटर आणि एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. मजुरी आणि वाहतूक खर्चही वाढल्यामुळे जुने दर कायम ठेवणे शक्य नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
सरसकट ब्रेडच्या पाकिटामागे कपन्यांकडून ५ रुपयांची वाढ
मुंबईसह काही अन्य शहरात पाव पाठवणाऱ्या बॉम्बे बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष नासिर अन्सारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले की, काही ब्रेड कंपन्यांनी दरवाढ केली असली तरी पावाच्या बेकरीचालकांनी अधिकृत दरवाढ केली नाही. आम्ही दरवाढीचा निर्णय घेतल्यास त्याची अधिकृत माहिती देण्यात येईल. मुंबईतील काही ब्रेड उत्पादन कंपन्यांनी सरसरकट ब्रेडच्या एका पाकिटामागे ५ रुपये वाढवले असून त्यामुळे इतरही कंपन्याही वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Web Summary : Mumbai's bread, pav, and khari prices surge by 10% due to rising production costs like flour, oil, and gas. Bakeries cite increased raw material prices, impacting consumers who rely on these staples for daily meals and snacks. Some bread companies have already increased prices.
Web Summary : मुंबई में मैदा, तेल की कीमतों में वृद्धि के कारण पाव, ब्रेड और खारी की कीमतों में 10% की वृद्धि हुई है। बेकरी मालिकों ने कच्चे माल की लागत बढ़ने का हवाला दिया, जिससे नाश्ते के लिए इन खाद्य पदार्थों पर निर्भर उपभोक्ताओं पर असर पड़ेगा। कुछ ब्रेड कंपनियों ने पहले ही कीमतें बढ़ा दी हैं।