शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 08:11 IST

महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून 'लोकनेता डी.बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे ठेवण्याचा प्रस्ताव पुढे पाठवला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकारने कालमर्यादेत निर्णय घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून 'लोकनेता डी.बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे ठेवण्याचा प्रस्ताव पुढे पाठवला होता. हे धोरण-निर्मितीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासारखे ठरेल, असे सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची व न्या. विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने, याचिकाकर्ता 'प्रकाशझोत सामाजिक संस्थे'च्या वकिलांना सांगितले.

नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाला आव्हान देणारी ही याचिका स्वीकारण्यास आपण इच्छुक नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने ती मूळ याचिका फेटाळून लावली होती. याचिकाकर्त्याला सक्षम प्राधिकरणासमोर हा खटला पुढे चालवण्याची मुभा (स्वातंत्र्य) 
खंडपीठाने दिली.

नाव ठरवणे हे न्यायालयाचे काम आहे का?
विमानतळाचे नाव काय असावे, हे ठरवणे हे न्यायालयाचे काम आहे का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.
विमानतळाचे नामकरण डी.बी. पाटील असे करण्याची मागणी होत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
राज्य सरकारने विमानतळाच्या नामकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही वकिलांनी नमूद केले.
राज्य सरकारलाच हा विषय पुढे नेऊ द्या. लोकशाही व्यवस्थेत तुम्हाला काही विशिष्ट अधिकार प्राप्त असतात आणि तुम्ही त्या अधिकारांचा वापर करून आपला पाठपुरावा करू शकता. हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असे खंडपीठाने निरीक्षण नोंदवले.

उच्च न्यायालयाने काय म्हटले होते?
याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने असे नमूद केले होते की, संविधानाच्या अनुच्छेद २२६ अन्वये आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर करणाऱ्या 'रिट कोर्टा'ला (न्यायालयाला), महाराष्ट्र सरकारने सादर केलेला प्रस्ताव स्वीकारण्याबाबत नागरी विमान मंत्रालयाला कोणताही आदेश देण्याचे अधिकार प्राप्त नसतात. कायदेशीर परिभाषेत समजल्यानुसार, प्रस्ताव हा केवळ हेतूचा एक आविष्कार असतो व त्यावरचा निर्णय नियम, विनियम व वैधानिक तरतुदींनुसार घेतला जाऊ शकतो, असे उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून लावताना नमूद केले होते.

निर्णय प्रलंबित ठेवणे अनाकलनीय 
नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी व्यक्त केलेली भूमिका अत्यंत समर्पक असून, विमानतळ नामकरण हा शासनाच्या धोरणात्मक अधिकारातील विषय असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय प्रलंबित ठेवणे अनाकलनीय असल्याचे मत प्रकल्पग्रस्त समितीचे प्रतिनिधी ॲड. विक्रांत घरत यांनी व्यक्त केले.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी ही प्रकल्पग्रस्तांची दीर्घकालीन व आग्रही भूमिका असून, त्यामागे व्यापक जनभावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावरील प्रकल्प असून, विमानतळासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत स्थानिकांच्या भावना आणि योगदानाचा आदर होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Refuses Hearing on Navi Mumbai Airport Naming Petition

Web Summary : Supreme Court declined to hear a petition urging a decision on renaming Navi Mumbai Airport after D.B. Patil. The court deemed it policy interference, allowing the petitioner to pursue the matter with relevant authorities. The High Court previously dismissed a similar plea.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालय