प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. २०१५ मध्ये पहिला भाग आला होता ज्यात गश्मीर महाजनीने राघव शास्त्रीची भूमिका साकारली होती. आता ११ वर्षांनी दुसरा भाग येतोय. यामध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी स्वामींच्या भूमिकेत आहेत. तर स्नेहल तरडे ही शेतकऱ्याची पत्नी आहे. 'आता परीक्षा देवाची' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. दरम्यान दुसऱ्या भागातही राघव शास्त्री हवा होता अशी प्रेक्षकांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
देऊळ बंद २ चं एक रील व्हायरल होतंय. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि गश्मीर महाजनीचं संभाषण सुरु आहे. गश्मीर म्हणतो, 'काय मग, कशाला बोलवलंय मला आज?' यावर मोहन जोशी म्हणतात, 'अरे जो तो भेटला की मला विचारतो की राघव शास्त्री देऊळ बंद २ मध्ये आहे की नाही? अरे धमकी दिल्यासारखे विचारतात. मग तू आहेस का नक्की?' यावर गश्मीर म्हणतो, 'तुमची काय इच्छा आहे? मी येऊ का?' तर मोहन जोशी म्हणतात, 'यावंस अशी माझी इच्छा आहे. माझीच काय हजारो लोकांची इच्छा आहे.' मग गश्मीर म्हणतो, 'अहो मग स्वामींनी आदेश दिलाय तर राघव शास्त्रीला यावंच लागणार ना! जशी स्वामींची इच्छा' मोहन जोशी 'तथास्तु!' म्हणतात.
पुढे व्हिडीओमध्ये सिनेमातील काही सीन्स दिसतात आणि शेवटी श्रीकृष्णाची एन्ट्री झालेली दिसते. गश्मीर महाजनी श्रीकृष्णाच्या भूमिकेत असल्याचा अंदाज आता नेटकऱ्यांनी लावला आहे. गश्मीर सिनेमात दिसणार असे संकेत या रीलमधून मिळत आहेत. यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.
'देऊळ बंद २' या चित्रपटाची भव्य निर्मिती कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी - सूर्यवंशी यांनी केली आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि ग्रामीण भागाचे वास्तववादी चित्रीकरण ट्रेलरमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. २१ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'देऊळ बंद २' मध्ये स्वामी भक्तीचा गजर आणि सामाजिक प्रबोधन यांचा अनोखा मिलाप प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
Web Summary : Gashmeer Mahajani may appear in 'Deool Band 2' after a viral reel showed a conversation hinting at his return as Raghav Shastri, possibly as Krishna. The film, focusing on farmers' plight, stars Mohan Joshi as Swami. Releasing May 2026.
Web Summary : गश्मीर महाजनी 'देऊल बंद 2' में दिख सकते हैं। वायरल रील में वापसी का संकेत है, राघव शास्त्री के रूप में कृष्ण की भूमिका में। फिल्म किसानों की दुर्दशा पर केंद्रित है, जिसमें मोहन जोशी स्वामी हैं। मई 2026 में रिलीज़।