1 / 10लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात पेट्रोलच्या दरानी शंभरी ओलांडली. देशभरातील इंधन दरामध्ये गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. ताज्या दरवाढीनंतर राज्यात पेट्रोलचा दर ९९.३८ रुपये ते १००.५६ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. 2 / 10इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर ९० पैशांची दरवाढ केली. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार होत असल्याने आणि आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.3 / 10राज्यात उत्तर गोवा आणि पणजी परिसरात पेट्रोलचा दर सर्वाधिक असून, येथे प्रतिलिटर १००.४० ते १००.५६ रुपये या दराने पेट्रोल मिळत आहे. तर दक्षिण गोव्यात तुलनेत दर किंचित कमी असून, ते ९९.३८ ते १००.३० रुपये प्रतिलिटर दराने विक्री केली जात आहे. 4 / 10गेल्या आठवड्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा ९० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल ९९.६८ रुपयांवर होते.5 / 10मालवाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल दर १०० रुपयांवर गेल्याने सार्वजनिक वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे. 6 / 10दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, खासगी वाहनधारक तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित वाहनचालक आर्थिक तणावात आले आहेत.7 / 10डिझेलच्या दरामध्येही वाढ झाली असून, उत्तर गोव्यात डिझेलचा दर प्रतिलिटर सुमारे २१.४९ रुपये इतका आहे. पर्यायी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सीएनजीचा दरही वाढून प्रतिकिलो २२ रुपयांवर पोहोचला आहे. 8 / 10गेल्या आठवड्यात डिझेल ८८.०९ ते २१.४१ रुपये प्रति लिटर होते. तर सीएनजीचा दर ८४ रुपये प्रति किलो होता. वास्को शहरातील पेट्रोल पंपांवर मंगळवारी पेट्रोल प्रतिलिटर ८९ पैशांनी वाढून १००.२५ रुपये झाले. 9 / 10तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २१ पैशांनी वाढ होऊन ते प्रतिलिटर २२.०२ रुपयांना विकले जात आहे. पाच दिवसांपूर्वी पेट्रोल प्रतिलिटर २९.३६ रुपये आणि डिझेल ९१.११ रुपये झाले होते.10 / 10पेट्रोल दर १०० रुपयांवर गेल्याने सार्वजनिक वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.