Join us
Daily Top 2Weekly Top 5

Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:55 IST

Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak case: शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर त्याच्या नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात असलेल्या सहभागाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षांसह इतर परीक्षांची शिकवणी घेणाऱ्या RCC क्लासेच संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला थेट नीट पेपरफुटीप्रकरणातच अटक झाली आहे. शिवराज मोटेगावकरचा नीट पेपर फुटी रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा सीबीआयचा आरोप आहे. त्याबद्दल काही पुरावेही सीबीआयला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने नीट प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच मिळवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सीबीआयने केलेल्या आतापर्यंतच्या तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, शिवराज मोटेगावकर याचे एनटीए अर्थात नीट परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय संस्थेतील प्राध्यापकांशी संबंध आहेत. पी.व्ही. कुलकर्णी याच्याशी मोटेगावकरचे खूप जवळचे संबंध आहेत. 

फुटलेला नीट पेपर मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटेगावकरच्या मोबाईलमध्येही नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पुरावे मिळाले आहेत. सीबीआयचे पथक मोटेगावकरच्या घरी गेले होते. तेव्हा झाडाझडती घेत असताना नीट परीक्षेची जी प्रश्नपत्रिका फुटली आहे, ती मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये मिळाली. 

दिल्लीच्या पथकाची नागपूर-चंद्रपूरमध्ये झाडाझडती

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता विदर्भ कनेक्शन समोर येऊ लागले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली येथील विशेष पथकाने मंगळवारी नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन उमेदवारांच्या घरी जाऊन झाडाझडती घेतली आहे. या कारवाईत नागपूर सीबीआय पथकानेही सहकार्य केले. तपास यंत्रणांच्या या हालचालींमुळे विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मोटेगावकरला दहा दिवस आधीच मिळाली होती प्रश्नपत्रिका?

तपास यंत्रणेच्या अर्थात सीबीआयच्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी म्हणजे नीट परीक्षा होण्याच्या जवळपास दहा दिवस आधी शिवराज मोटेगावकर याच्याकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरे आली होती. त्यानंतर त्याने हाताने लिहिलेल्या नोट्सच्या माध्यमातून अनेकांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पुरवली. परीक्षा संपल्यानंतर या नोट्स नष्ट करण्यात आल्याचाही संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Paper Leak: Motegaonkar's phone held key evidence; message trapped him.

Web Summary : Shivraj Motegaonkar arrested in NEET paper leak; CBI suspects his involvement. Evidence found on his phone suggests pre-exam access to the paper. Nagpur-Chandrapur searches conducted; Motegaonkar allegedly distributed handwritten notes of answers.
टॅग्स :नीट परीक्षा पेपर लीकनीट परीक्षासीबीआयपुणेलातूरगुन्हेगारी