शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Pune: राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करतांना ३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 14:17 IST

Pune Zipline Accident: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी तरल आटपाळकर आपल्या कुटुंबियांसह राजगड वॉटर पार्कमध्ये गेली होती.

Pune Zipline Accident:पुणे-सातारा महामार्गावरील वरवे खुर्द (ता. भोर) गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्क रिसॉर्टमध्ये झिपलाइनिंग करताना ३० फूट उंचीवरून कोसळून एका २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. तरल अरूण आटपाळकर (रा. सेलेशिया पार्क, न-हे, धायरी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.या प्रकरणी तरलचे वडील नंदकिशोर श्रीपती आटपाळकर (वय ५०) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संबंधित घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.अधिकच्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी तरल आटपाळकर आपल्या कुटुंबियांसह राजगड वॉटर पार्कमध्ये गेली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती झिपलाइनिंग करत असताना सुरक्षा दोर योग्यरीत्या रेलिंगला न लावता ती लोखंडी स्टुलवर उभी राहिली. परंतु स्टुल हलल्याने तिचा तोल गेला आणि ती साइडच्या रेलिंगवर आदळून थेट ३० फूट खाली कोसळली. तिला तत्काळ नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या घटनेनंतर वॉटर पार्कमधील सुरक्षेची अक्षम्य निष्काळजीपणा समोर आला असून, स्थानिकांनी वॉटर पार्कच्या मालकावर आणि चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे वॉटर पार्कसारख्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा व्यवस्था आणि देखरेखीची गरज अधोरेखित झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रwater parkवॉटर पार्कDeathमृत्यूbhor-acभोरPoliceपोलिसAccidentअपघात