शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

उसन्या पैशांचा वाद; बुधवार पेठेत वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 09:52 IST

महिलेला तो व्यक्ती दररोज बुधवार पेठेत सोडत होता, त्याच्याकडून महिलेने ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते

पुणे : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. या प्रकरणी एका रिक्षा चालकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली. श्यामली कमलेश सरकार (४०, रा.सूर्य उज्ज्वल हाइट्स, रायकर मळा, धायरी, सिंहगड रोड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नितीन चंद्रकांत पंडित (५१, रा.निसर्ग हाईटजवळ, धायरी, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिस कर्मचारी नितीन तनपुरे यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित हे ओळखीचे होते. ती बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत देहविक्रय करायची. पंडित तिला रिक्षातून दररोज बुधवार पेठेत सोडायचा. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. तिने पंडितकडून ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते.

पंडितने तिला पैसे परत मागितले होते. पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये वाद झाले. बुधवारी (दि. ४) दुपारी चारच्या सुमारास पंडित तिला घेण्यासाठी धायरीतील रायकर मळा परिसरात गेला. सरकारच्या सदनिकेत तो गेला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादातून पंडितने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर, पंडित हा बुधवारी रात्री नांदेड सिटी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि सरकारचा खून केल्याची कबुली दिली. पंडितला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आणि तपास अधिकारी गुरुदत्त मोरे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसDeathमृत्यूProstitutionवेश्याव्यवसायWomenमहिला