Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५५ जणांची कोरोनावर मात; तर २६६ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 06:42 PM2021-06-20T18:42:33+5:302021-06-20T18:42:40+5:30

सद्यस्थितीत शहरात २ हजार ५६३ सक्रिय रुग्ण

255 people beat up Corona in Pune on Sunday; While 266 new patients | Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५५ जणांची कोरोनावर मात; तर २६६ नवे रुग्ण

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५५ जणांची कोरोनावर मात; तर २६६ नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देशहरात रविवारी १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत. आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे

पुणे: शहरात रविवारी २६६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात २ हजार ५६३ सक्रिय रुग्ण आहेत. 

आज विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ५०० संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.९१ टक्के इतकी आहे. तर आज १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ३७३ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ५३९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख १४ हजार ९१२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७५ हजार ८५४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६४ हजार ७६० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: 255 people beat up Corona in Pune on Sunday; While 266 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.