शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शिवसेना-भाजपात वाद पेटला; माजी आमदार विजयराज शिंदेंना मारहाण, बुलडाण्यात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 1:15 PM

Shivsena MLA Sanjay Gaikwad: भाजपचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह एक जण किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसंजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते चौकात जमले होते. आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विरोध केला.दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची होऊन राडा झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

बुलडाणा - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात कोरोनासंदर्भाने शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जमलेले भाजपाचे कार्यकर्ते व त्यास विरोध करण्यासाठी समोर आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये १८ एप्रिल रोजी बुलडाण्यात राडा झाला. याप्रकरणी उभय बाजूंनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्याची प्रक्रिया सुरू होती.(Clashes Between Shivsena & BJP Over MLA Sanjay Gaikwad Controversial Statement on Devendra Fadnavis)

यामध्ये भाजपचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह एक जण किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती आहे. १८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जयस्तंभ चौकात भाजपाचे पदाधिकारी योगेंद्र गोडे, माजी आ. विजयराज शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्यासह भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी त्यांचा पुतळा जाळण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना त्यास विरोध केला.

“तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर...”; शिवसेना आमदार संजय गायकवाडांची भाजपा आमदाराला धमकी

दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची होऊन राडा झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते व बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचा बंदोबस्त, शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, जयस्तंभ चौकातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात पोहोचले होते. या राड्यामध्ये भाजपाचे नेते माजी आ. विजयराज शिंदे यांच्यासह दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. शिंदे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात यानंतर वैद्यकीय तपासणीही केली.

दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनीही या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दिली असून माजी आमदार शिंदे यांनीही आपल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढविल्याचा आरोप केला आहे. पोलीस प्रशासनाकडूनही दोन्ही गटांविरोधात संचारबंदीचा भंग तथा आपत्तीव्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्याचा आधार घेत गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घटनेचा गांभीर्य पाहता अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोड, एसडीपीओ रमेश बरकते यांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडले आहे.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अटक करा”; राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

फडणवीस व कुटे यांच्या पुतळ्याचे दहन

बुलडाण्यातील या घटनेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोताळा आणि सिंदखेडराजा येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर बुलडाण्यात भाजपचे माजी मंत्री संजय कुटे यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे सध्या शहरात  वातावरण तणावपूर्ण असल्याचे चित्र आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनासंदर्भात भाजपा करत असलेल्या राजकारणाविरोधात वक्तव्य केले. त्यावेळी त्यांनी ‘कोरोनाचे जंतू सापडले तर फडणवीसांच्या तोंडात टाकले असते’ असे वक्तव्य केले होते. सोबतच भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर हे संपूर्ण राजकारण पेटले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Gaikwadसंजय गायकवाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्या