Video: निगडीत रस्त्यावर कोसळलं भलंमोठं झाड; महिला थोडक्यात बचावली, वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:47 IST2026-04-17T13:45:44+5:302026-04-17T13:47:38+5:30

- पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रीची घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेने रस्ता मोकळा

pimpari-chinchwad video A huge tree fell on a busy road; Woman narrowly escapes, traffic affected | Video: निगडीत रस्त्यावर कोसळलं भलंमोठं झाड; महिला थोडक्यात बचावली, वाहतुकीवर परिणाम

Video: निगडीत रस्त्यावर कोसळलं भलंमोठं झाड; महिला थोडक्यात बचावली, वाहतुकीवर परिणाम

पिंपरी -  पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात काल उशिरा रात्री एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेच्या जवळ अचानक भलंमोठं झाड कोसळलं. सुदैवाने, या दुर्घटनेत संबंधित महिला थोडक्यात बचावली असून तिला किरकोळ दुखापत झाली आहे. यादरम्यानचा व्हिडिओ सोशलवर चर्चेत आहे.  



अधिकच्या माहितीनुसार, घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. झाड रस्त्यावर आडवे पडल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ही घटना वर्दळीच्या मार्गावर घडल्याने नागरिकांना काही वेळ त्रास सहन करावा लागला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने झाड कापून रस्ता मोकळा केला. त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे जुन्या व धोकादायक झाडांची तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 

Web Title : निगडी में सड़क पर गिरा विशाल पेड़; महिला बाल-बाल बची

Web Summary : पिंपरी-चिंचवड के निगडी में एक विशाल पेड़ गिरने से एक महिला बाल-बाल बच गई। घटना से यातायात बाधित हुआ। दमकल कर्मियों ने सड़क साफ कर यातायात सुचारू किया। निवासियों ने पुराने, खतरनाक पेड़ों की जांच की मांग की है।

Web Title : Huge Tree Falls on Road in Nigdi; Woman Narrowly Escapes

Web Summary : A woman narrowly escaped injury when a large tree fell in Nigdi, Pimpri-Chinchwad. The incident caused traffic congestion. Firefighters cleared the road, restoring traffic flow. Residents are demanding inspection of old, dangerous trees.