शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदीवरील धोकादायक पूल बंद; दुरुस्ती रखडल्याने नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:06 IST

- चऱ्होली ते मरकळ-सोळू एमआयडीसी मार्गावर वाहतुकीची कोंडी, पर्यायी रस्त्याने वळवली वाहने  

पिंपरी : चऱ्होली ते मरकळ आणि सोळू एमआयडीसी जोडणारा इंद्रायणी नदीवरील श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे पूल धोकादायक झाल्याने दुरुस्तीसाठी बंद केला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये बंद झालेल्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दीड महिन्यांपासून काम रखडल्याने छोटे व्यावसायिक आणि नागरिकांची गैरसोय होत असून, अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

चार ते पाच महिन्यांपूर्वी हा पूल धोकादायक घोषित केला होता. डिसेंबर २०२५ मध्ये वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) मार्च २०२६ पर्यंत लोड बेअरिंगचे काम पूर्ण होणार होते. मात्र, दीड महिन्यांपासून दुरुस्ती सुरू झालेली नाही. पूल कमकुवत झाल्याने वाहतुकीस धोका असल्याचे कारण दिले आहे.

वाहतुकीवर परिणाम

या मार्गावरून दररोज ४ ते ५ हजार वाहने ये-जा करत असत. आता ही वाहने शेलपिंपळगाव, निरगुडी, भोसरीमार्गे वळवण्यात आली आहेत. देहू फाटा, आळंकापूर चौक, तापकीर चौक, पांजरपोळ चौक, गोडाऊन चौक, मोशी मार्गे पर्यायी रस्ते वापरण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.

नागरिकांच्या तक्रारी

पूल बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. वाहतूककोंडी वाढल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नगरसेवक नितीन काळजे, सचिन तापकीर, सुनील काटे, संदीप खैरे, सागर दाभाडे यांनी लवकरात लवकर दुरुस्ती सुरू करण्याची मागणी केली आहे. ‘पुलाची दुरुस्ती कधी सुरू होणार आणि नागरिकांची गैरसोय कधी दूर होणार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.  याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय पाटील यांना संपर्क होऊ शकला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Dangerous Indrayani River Bridge Closed; Repairs Delayed, Citizens Suffer

Web Summary : The Indrayani River bridge connecting Charholi to Markal is closed for repairs since December 2025, causing significant disruption. The delayed repairs are impacting businesses and daily life, prompting calls for swift action from local representatives.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेriverनदीpollutionप्रदूषण