पत्नीवर अश्लील कमेंट केल्यानं रुमालानं गळा आवळून मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:06 IST2021-09-22T14:52:44+5:302021-09-22T15:06:23+5:30

आसामला पळून जाण्याच्या तयारीतील आरोपीला बेड्या

Murder of a friend because making obscene comments on his wife | पत्नीवर अश्लील कमेंट केल्यानं रुमालानं गळा आवळून मित्राचा खून

पत्नीवर अश्लील कमेंट केल्यानं रुमालानं गळा आवळून मित्राचा खून

ठळक मुद्देदोन दिवसापूर्वी आरोपीने मित्राच्या पत्नीवर अश्लील कमेंट केली होती दोघ दारूच्या नशेत असताना भांडण झाल्यानं घडली ही घटना

पिंपरी : पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्यानं मित्राचा खून केला. सूस रोड, बाणेर येथे सोमवारी (दि. २०) ही घटना उघडकीस आली. खून केल्यानंतर आरोपी मूळ गावी आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.    

अच्युत भुयान (वय ३७, रा. सुस रोड, बाणेर), असं खून झालेल्याचं नाव आहे. कमल राजन शर्मा (वय १८, रा. सुस रोड, बाणेर), असं अटक आरोपीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल आणि भुयान हे एकाच सिक्युरिटी कंपनीत कामाला होते. दोन दिवसांपूर्वी भुयानने  कमलच्या पत्नीवर अश्लील कमेंट केल्यानं त्यांची भांडण झाली. घटनेच्या दिवशी भुयान घरी होता. कमल कामावरून घरी आल्यानंतर भुयानला दारू पाजली. दारूच्या नशेत भुयाननं पुन्हा आरोपीच्या पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्यानं त्यांच्यात भांडणं झाली. त्यावेळी आरोपीने लांब रुमालाने भुयानचा गळा आवळून खून केला व तेथून पुन्हा कामावर गेला. 

भुयान याच्या खोलीवर स्वयंपाक करणारी महिला सोमवारी सायंकाळी पाचला आली असता भुयान हा गळ्याला फास अडकवलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. गुन्हा केल्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी आसाम येथे जात होता. स्थानिक नागरिकांशी चौकशी करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.  

Web Title: Murder of a friend because making obscene comments on his wife