नणंदेचे भांडण सोडवायला गेलेल्या भावजयचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 19:32 IST2019-11-08T19:31:12+5:302019-11-08T19:32:49+5:30

भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीमध्ये गेले असता आरोपीने त्यांनाही अश्लिल बोलून शिवीगाळ केली..

molestation of women in wakad | नणंदेचे भांडण सोडवायला गेलेल्या भावजयचा विनयभंग

नणंदेचे भांडण सोडवायला गेलेल्या भावजयचा विनयभंग

पिंपरी : फिर्यादी महिला या त्यांच्या नणंदेच्या घरी गेल्या. तिथे आरोपी नणंदेचा शिवीगाळ व मारहाण करताना पाहून फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेल्या. त्यावेळी आरोपी यांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि ६) सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास वाकड येथे घडली.
 याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिपक मल्लेश एलफुल्लायादव (रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी या त्यांची नणंद यांच्याबरोबर त्यांच्या घरी मुलाचे दप्तर व कपडे आणण्यासाठी गेल्या. तिथे गेल्यावर आरोपी दिपक यांने फिर्यादी यांच्या नणंदेस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीमध्ये गेले असता आरोपीने त्यांनाही अश्लिल बोलून शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल झाला असून वाकड पोलीस तपास करत आहेत.


 

Web Title: molestation of women in wakad