शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पुणे विभागातील २६ रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा नाही; केवळ १०७ बॅग शिल्लक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 12:39 IST

कोरोना वाढत असताना तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

ठळक मुद्देपुणे विभागात २५ फेब्रुवारीपर्यंत ४३७८ दात्यांनी प्लाझ्मा केले दान

तेजस टवलारकर -पिंपरी-चिंचवड : पुणे विभागात ४२ रक्तपेढ्यांच्या माध्यमातून प्लाझ्मा संकलन आणि वितरण करण्यात येते. सद्य:स्थितीत या ४२ रक्तपेढ्यांमध्ये २०० एमएलच्या १०७ प्लाझ्मा बॅग शिल्लक आहेत. या ४२ रक्तपेढ्यांपैकी २६ रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. १६ रक्तपेढ्यांमध्ये केवळ १०७ बॅग प्लाझ्मा शिल्लक आहे. सोलापूरच्या रक्तपेढीत सर्वाधिक ३४ बॅग शिल्लक आहेत, तर कोल्हापूरच्या रक्तपेढीत २२ बॅग शिल्लक आहेत. बाकी सर्व रक्तपेढ्यांमध्ये एक ते पाच अशा बॅग उपलब्ध आहेत. फेब्रुवारीपासून अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने विभागात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. परिणामी प्लाझ्माची मागणी कमी झाली होती. प्लाझ्मादानही कमी झाले होते. परंतु, आता रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा प्लाझ्माच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक प्लाझ्मासाठी रक्तपेढ्यांमध्ये विचारणा करीत असल्याची स्थिती आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. या काळात प्लाझ्मा मिळणे कठीण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर प्लाझ्मादान वाढले होते.

कोरोनाची मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या व औषधोपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात येते. कोरोनावर अद्यापही औषध उपलब्ध नाही, त्यामुळे गंभीर रुग्णांना प्लाझ्माची गरज लागते. वयोवृद्ध रुग्णांना बरे होण्यासाठी सर्वाधिक प्लाझ्माची आवश्यकता लागते. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकतात.---

आतापर्यंत ४३७८ दात्यांनी केले दानपुणे विभागात २५ फेब्रुवारीपर्यंत ४३७८ दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. त्यातून २०० एमएलच्या ८९०१ प्लाझ्मा बॅग तयार करण्यात आल्या आहेत. यातील २०० एमएलच्या ८७५१ बॅगचे वितरण करण्यात आले आहे. वितरण केलेल्यांपैकी ४३ बॅग या निरुपयोगी ठरल्या आहेत

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल