Airtel चा धमाका! 'या' रिचार्जवर मिळणार 168 GB डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:39 AM2020-05-29T11:39:16+5:302020-05-29T11:49:50+5:30

एअरटेल (Airtel) कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी जिओ आणि व्होडाफोन-आयडिया कंपनीला टक्कर देण्यासाठी आता खास प्लॅन आणले आहेत.

सध्या कोरोनाचा संकटामुळे अनेकांचे काम घरातून सुरु आहे. त्यामुळे हीच संधी साधत एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे नवीन प्लॅन धासू प्लॅन आणले आहेत.

एअरटेल कंपनीकडून Work frome home आणि तरुणांसाठी खास तीन वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. याची वैधता 84 दिवस असणार आहे. 379, 598, 698 असे हे तीन टेरिफ प्लॅन आहेत.

एअरटेलच्या 379 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, 6 GB डेटा 900 SMS मिळणार आहेत. त्याशिवाय ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.

जे ग्राहक डेटा कमी आणि कॉलिंग सेवेचा जास्त लाभ घेतात. त्यांच्यासाठी 379 रुपयांच्या प्लॅन बेस्ट असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते.

त्याचबरोबर, एअरटेला 598 रुपायांच्या प्लॅनमध्ये 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, रोज 1.5 GB डेटा 100 SMS मिळणार आहेत. त्याशिवाय ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.

कंपनीचा तिसरा 698 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 2 GB डेटा मिळणार आहे. त्यामुळे एकूण 168 GB ग्राहकांना मिळणार आहे. शिवाय, 100 SMS मिळणार आहेत.

तसेच, 698 रुपयांच्या प्लॅनमध्ये ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.