चिंचेचा फेसपॅक-कधी ऐकला नसेल तुम्ही असा आंबटचिंबट उपाय-एकदा लावा आणि पाहा तुमच्या चेहऱ्यावरची जादू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 14:24 IST2026-04-14T14:14:03+5:302026-04-14T14:24:01+5:30

चिंचेचा उपयोग वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कसा करायचा हे आपल्याला माहितीच आहे. चिंच लावून तांबे- पितळाची भांडी घासली तर ती अगदी चकाचक होतात हे देखील आपल्याला माहिती आहे.

आता त्याच चिंचेचा वापर करून चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कसे कमी करायचे ते पाहुया. पिगमेंटेशन कमी करून त्वचेवर छान ग्लो आणण्यासाठी चिंच अतिशय उपयुक्त ठरते.

यासाठी सगळ्यात आधी थोडीशी चिंच २ ते ३ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.आता भिजलेल्या चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात अर्धा चमचा दही घाला..

तसेच अर्धा चमचा मध घाला. मध आणि दही यामुळे तुमच्या त्वचेत आणखीनच छान बदल दिसून येईल.

आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराईज करा. हा उपाय महिन्यातून ७ ते ८ वेळा केल्यास पिगमेंटेशन कमी होतात, असं mansifaceyoga या इंस्टाग्राम पेजवर सांगितलं आहे.

















