Mother's Day Special : एकाच साडीचे शिवा १० मॉडर्न आऊटफिट्स! लाडक्या लेकीसोबत करा ट्विनिंग - आई लेकीची जोडी दिसेल भारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2026 15:05 IST2026-05-09T11:06:15+5:302026-05-09T15:05:48+5:30

best twinning outfit ideas for mother and daughter : Mother’s Day special mother daughter matching dress combination ideas : mother daughter matching dresses : Mother’s Day matching outfits : मदर्स दे सेलिब्रेशनसाठी एकाच साडीचे तयार करा स्वतःसाठी आणि लेकीसाठी स्टायलिश कॉम्बो ड्रेस...

Mother's Day निमित्त काहीतरी खास करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशातच कपाटात पडून असलेल्या जुन्या पण आवडत्या साडीचा सुंदर री-यूज करून आपण स्वतःसाठी आणि मुलीसाठी आकर्षक ड्रेस कॉम्बिनेशन तयार करणं ही एक भन्नाट आणि क्रिएटिव्ह आयडिया ठरू शकते(old saree reuse ideas for mother daughter dresses).

जुन्या साड्यांमध्ये अनेक आठवणी दडलेल्या असतात. योग्य डिझाईन आणि थोडी कल्पकता वापरली, तर त्याच साडीपासून स्टायलिश गाऊन, कुर्ती, फ्रॉक, को-ऑर्ड सेट किंवा मॅचिंग ड्रेस सहज शिवता येतात. यामुळे जुन्या साडीला नवा लुक मिळतो आणि आई-मुलींचं ट्विनिंगही खूप सुंदर दिसतं.

वर्षानुवर्षे आपल्या कपाटांत काही साड्या तशाच पडून राहतात. यंदाच्या मदर्स डे ला याच जुन्या साड्यांना एक नवीन ट्विस्ट देऊन, स्वतःसाठी आणि लेकीसाठी 'ट्विनिंग' किंवा 'मॅचिंग ड्रेस' शिवून मदर्स डे निमित्त तुम्ही ट्विनिंग करु शकता. यंदाच्या मदर्स डे ला काही हटके आणि कायम लक्षात राहील अशी आठवण जपून ठेवायची असेल तर जुन्या साडीपासून तयार होणारे हे ड्रेस कॉम्बिनेशन आयडियाज नक्की पाहा.

१. आईच्या जुन्या सिल्क किंवा काठपदराच्या साडीपासून आई आणि मुलीसाठी रॉयल अनारकली ड्रेसेस शिवता येतात.

२. जुन्या कॉटन किंवा शिफॉन साडीपासून स्टायलिश को-ऑर्ड सेट किंवा श्रग तयार करा. हा लुक मदर्स डे च्या पार्टीसाठी परफेक्ट आहे.

३. साडीचा घेर वापरून मुलीसाठी लेहेंगा आणि आईसाठी त्याच साडीचा सुंदर वन-पीस किंवा स्कर्ट-ब्लाउज डिझाईन करा.

४. आईच्या किंवा आजीच्या जुन्या एकाच साडीपासून आपण स्वतःसाठी आणि लेकीसाठी स्लिव्हलेस वन पीस लॉँग गाऊन शिवू शकता. पार्टीसाठी किंवा एखाद्या घरातील खास फंक्शनसाठी आपण अशा प्रकारचा ड्रेस कॉम्बिनेशन शिवून परफेक्ट पेअरिंग करु शकता.

५. साडीच्या काठाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून आपण ड्रेस अधिक आकर्षक आणि सुंदर डिझाईन करुन शिवून घेऊ शकता.

६. आई आणि लेकीसाठी ड्रेसचे ट्विनिंग करताना आपण लॉन्ग पॅटर्नचा अनारकली शिवून लग्न, सणसमारंभ सारख्या फंक्शनला परफेक्ट मॅच करु शकता.

७. जर साडी काठा पदराची असेल तर त्यापासून आई-मुलीसाठी लाँग मॅक्सि ड्रेसेस शिवणे हा एक उत्तम पर्याय आहे. आईसाठी लॉन्ग गाऊन – मुलीसाठी फ्रॉक शिवून घेऊ शकता.

८. एकाच साडीपासून आई-मुलीसाठी स्टायलिश कुर्ती आणि पलाझो सेट शिवा.

९. अनारकली विथ दुपट्टा असं ड्रेसच कॉम्बिनेश देखील आई - मुलीच्या जोडीसाठी अत्यंत देखणं दिसतं.

१०. अनारकली सोबतच आपण साधा नेहमीच्या वापरातला पंजाबी, चुडीदार सूट देखील शिवून घेऊ शकता.

११. सिल्क किंवा जॉर्जेट साडीपासून सुंदर ट्विनिंग लुक तयार करू शकता आणि पंजाबी सूट देखील शिवू शकता.