'या' देशांसारखे वाहतूक नियम झाले तरच वाहनचालकांना लागेल शिस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:51 PM2019-07-17T13:51:04+5:302019-07-17T13:56:32+5:30

मागील 5 वर्षात अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक नियम पाळण्यासाठी कडक पावलं उचलणं गरजेचे आहे. 1988 मोटर वाहन कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत आलं मात्र ते राज्यसभेत अडकून राहिलं आहे. या नवीन लोकसभेत हे विधेयक पुन्हा नव्याने आणलं आहे. मात्र यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे.

रस्ते अपघातात भारतात दरवर्षी जवळपास अडीच लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी कडक नियम बनविणे गरजेचे आहे. इतक्या प्रमाणात जीवितहानी होत असेल तर ते देशासाठी धोकादायक आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अभ्यासानुसार रस्ते अपघातामुळे भारताला दरवर्षी जीडीपीच्या एकूण 3 टक्के भागाचं नुकसान होतं. म्हणजे 5 लाख 96 हजार कोटी देशाचं नुकसान होतं. एवढं नुकसान केन्या सारख्या जीडीपीबरोबर आहे.

भारतात वाहतुकीचे नियम सर्रासपणे डावलले जातात. मात्र दुसऱ्या देशात लहान लहान चूकही महागात पडू शकते.

जर तुमची गाडी खराब असेल तर रशिया आणि रोममध्ये बेकायदेशीर आहे. नंबर प्लेट, हेड लाइटवर घाण असेल तर त्यांना दंड भरायला लागू शकतो.

जर रस्त्यावर पाणी असेल आणि वाहन चालक जोरात गाडी चालवून रस्त्यावरुन चालणाऱ्या माणसावर पाणी उडवत असेल तर हादेखील गुन्हा आहे. ब्रिटेनमध्ये हा कायदा मोडणाऱ्याला शिक्षा केली जाते.

नार्वेमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागते इतकं नाही तर 10 टक्के वार्षिक उत्पन्नात दंड बसतो. आइसलँडमध्ये वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 1 लाख 80 हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागतो.

टर्कीमध्ये कारमध्ये Fire Extinguisher ठेवणं बंधनकारक आहे. असं न केल्यास वाहन चालकाला दंड भरावा लागू शकतो.

फ्रान्समध्ये कार चालविताना गाडीत Breath Alyzer ठेवणं बंधनकारक आहे. Breath Alyzer हे एक असं यंत्र आहे ज्यामुळे पोलिसांना वाहन चालक किती प्रमाणात दारु प्यायला आहे याची माहिती मिळते.