मुंबईत परीक्षा केंद्रावर पडली प्रेमात; लग्न करून मूल झालं, अन् 5 वर्षांनंतर मुलाने दिला धोका...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:02 PM2023-01-31T16:02:49+5:302023-01-31T16:08:25+5:30

बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील बारबिघा पोलीस स्टेशन परिसरातून एक अनोखी घटना समोर आली आहे.

शेखपुरा जिल्ह्यात प्रेयसीपासून पत्नी बनलेली सुमन पत्नीचा हक्क मिळवण्यासाठी आपल्या 5 वर्षाच्या मुलासह पतीच्या दारात ठाण मांडून बसली आहे. खरं तर सुमन रांची येथील रहिवासी आहे. 2014 मध्ये सुमन परीक्षा देण्यासाठी मुंबईत आली होती. ज्या परीक्षा केद्रांत तिचा पेपर होता तिथेच बारबिघा येथील आशिषचा पेपर होता. परीक्षेपूर्वी दोघांमध्ये संभाषण झाले आणि नंतर या संवादाचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले.

दोघांनी मंदिरात लग्न केले आणि 5 वर्षे पाटण्यात एकत्र राहत होते. दरम्यान, सुमनने एका मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर सुमन आपल्या मुलासह 6 महिने सासरच्या घरी राहिली.

त्यानंतर पती-पत्नी शेखपुरा येथील चांदणी चौकात 2 वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले होते, मात्र 21 जानेवारीपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

प्रेम आणि लग्नानंतर आता फसवणुकीची कहाणी सुरू झाली. आता सासरच्या मंडळींनी सुमनला घरात न ठेवण्याचा निर्धार केला. पती आशिषनेही आता मोबाईल बंद केला आहे. मग शेखपुरा येथील पत्नी सुमन बारबिघा येथील सासरच्या घरी पोहोचली, मात्र तिला घरात येऊ दिले नाही.

आता सुमन आपल्या 5 वर्षाच्या मुलाच्या मदतीने पत्नी असल्याच्या हक्कासाठी लढत आहे. पीडित महिला पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा करत आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले, पण आशिषच्या घराचा दरवाजा न उघडल्याने पोलीस परत आल्याने बारबिघा पोलिसांनी पीडितेला महिला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचा सल्ला दिला.