M S Dhoni नंतर सुशांत-दिशाला होती 'या' सिनेमाची ऑफर, अभिनेत्याने ऐनवेळी घेतला काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 05:00 PM2024-06-13T17:00:01+5:302024-06-13T17:09:21+5:30

सुशांत-दिशा पाटनीची जोडी आणखी एका सिनेमात दिसणार होती. तसंच M S Dhoni मध्ये दिशाच्या जागी या अभिनेत्रीला होती आधी ऑफर

अभिनेत्री दिशा पाटनी(Disha Patani) आज 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2015 साली आलेल्या 'लोफर' तेलुगू सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर 2016 साली तिने 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

एम एस धोनी सिनेमात सुशांतसिंह राजपूत आणि दिशा पाटनीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. दिशाने यामध्ये धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंडची प्रियंका झाची भूमिका साकारली होती.

पण तुम्हाला माहितीये का दिशाच्या आधी रकुल प्रीत सिंहला प्रियंका झाची भूमिका ऑफर झाली होती. पण तेव्हा रकुल साऊथ सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने तिला एम एस धोनी सिनेमाला नकार द्यावा लागला. त्यामुळे दिशा पाटनीची सिनेमात एन्ट्री झाली.

एम एस धोनी सिनेमाने तेव्हा 200 कोटी कमावले. सिनेमाच्या यशानंतर दिशा आणि सुशांतसिंहची जोडी आणखी एका सिनेमात दिसणार होती. पण ऐनवेळी सुशांतनेच सिनेमाला नकार दिला होता.

२०१७ साली सुशांत आणि दिशा यांच्या या सिनेमाचं नाव होतं 'रोमियो अकबर वॉल्टर'. यामध्ये सुशांत एजंटच्या भूमिकेत होता तर दिशा गुप्तहेर होती.मात्र अचानक असं काही झालं की मेकर्सही हैराण झाले.

सुशांतने अचानक 'रोमियो अकबर वॉल्टर' सिनेमातून काढता पाय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांना धक्काच बसला. निर्माते बंटी वालिया देखील शॉक झाले.

मेकर्ससाठी सुशांतच्या जागी दुसरा अभिनेता शोधणं कठीण होतं. सिनेमाचे पोस्टर्सही आऊट झाले होते पण तारखा जुळत नसल्याने सुशांतने सिनेमाला नकार दिला.

अखेर जॉन अब्राहमने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली. २०१९ साली 'रोमियो अकबर वॉल्टर' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये मौनी रॉयही झळकली.