बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला

बांगलादेश-नेदरलँड्स यांच्यातला सामना नॉक आऊट असेल, कारण विजेता संघ सुपर ८ च्या दिशेने मोठी भरारी घेईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 08:58 PM2024-06-13T20:58:58+5:302024-06-13T20:59:15+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 BAN vs NED Live: brilliant catch take by Engelbrecht!  Aryan Dutt has two, Litton has to go, Ball stuck in the helmet of Tanzid, Video | बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला

बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 BAN vs NED Live:  बांगलादेश-नेदरलँड्स यांच्यातला सामना नॉक आऊट असेल, कारण विजेता संघ सुपर ८ च्या दिशेने मोठी भरारी घेईल. अर्थात या दोन संघांमध्ये नेट रन रेटची टशन पाहायला मिळेल. पावसामुळे विलंबाने झालेली नाणेफेक नेदरलँड्सने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशचा सलमावीर नजमुल शांतो दुसऱ्याच षटकात रिव्हर्स स्वीप मारायला गेला अन् लेग स्लीपमध्ये विक्रमजीत सिंगला सोपा झेल देऊन परतला. आर्यन दत्तने ही विकेट मिळवली. तंझिद हसन दमदार फटकेबाजी करताना दिसला, परंतु व्हिव्हियन किंगमाचा अप्रतिम बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळल्याने धाकधुक वाढली. चेंडू त्याच्या हल्मेटच्या जाळीतच अडकला होता.


बांगलादेशचा अनुभवी फलंदाज लिटन दासने ( १) चौथ्या षटकात खणखणीत स्वीप शॉट मारला, परंतु इगलब्रेचने तितकाच अफलातून झेल घेऊन त्याला माघारी पाठवले. हसन आणि शाकिब अल हसन यांनी बांगलादेशचा डाव सावरला आणि पॉवरप्लेमध्ये संघाला २ बाद ५४ धावांपर्यंत पोहोचवले. 


सुपर ८ साठी आतापर्यंत पात्र ठरलेले संघ
भारत
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिज 

आयसीसीने ठरवलेल्या सिडींगनुसार ऑस्ट्रेलिया व भारत यांना ग्रुप १ मध्ये स्थान दिले गेले आहे आणि २४ जूनला हे संघ समोरासमोर येणार आहेत. तेच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ग्रुप २ मध्ये जागा दिली गेली आहे.  दक्षिण आफ्रिकेने ड गटातून सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे. या गटात बांगलादेश व नेदरलँड्स यांच्यात टफ फाईट आहे. दोन्ही संघ दोन सामन्यांत प्रत्येकी २ गुणांसह शर्यतीत आहेत. आज बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामना आहे आणि यातील विजेता हे चित्र स्पष्ट करेल. 
 

Web Title: T20 World Cup 2024 BAN vs NED Live: brilliant catch take by Engelbrecht!  Aryan Dutt has two, Litton has to go, Ball stuck in the helmet of Tanzid, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.