PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न

Danielle Wyatt weds Georgie Hodge : इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटने विराटला प्रपोज करून प्रसिद्धी मिळवली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज करून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटने प्रसिद्धी मिळवली होती.

तेव्हापासून डॅनिएल क्रिकेट विश्वात ओळखीचा चेहरा बनली. आता तिने तिची प्रेयसी जॉर्जी हॉजसोबत लग्न केले आहे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटने याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

काही वर्षांपूर्वी तिने विराट कोहली ( Virat Kohli) लग्नासाठी मागणी घातली होती आणि तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली होती. डॅनिएल वॅटने गर्लफ्रेंड जॉर्जी हॉजसोबत विवाहगाठ बांधली.

हॉज ही महिला फुटबॉल संघाची व्यवस्थापक राहिली आहे. दोघीही खेळाशी संबंधित आहेत.

२०१४ मध्ये वॅटने सोशल मीडियावर लिहिले होते, कोहली माझ्याशी लग्न कर... अशी पोस्ट लिहिली होती. आता १० वर्षांनंतर वॅटने लग्न केले.

तिचा आणि कोहलीचा एकत्र फोटोही व्हायरल झाला होता. विराट कोहलीने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले.

डॅनिएल वॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतके झळकावली आहेत. तिने २०१० मध्ये वन डे आणि ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

तिने १०२ वन डे सामन्यांत १७७६ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १२९ धावा ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.