शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य

T20 World Cup 2024 BAN vs NED Live:  नॉक आऊट सामन्यात बांगलादेशने सुरुवातीच्या पडझडनंतर नेदरलँड्सला उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 09:56 PM2024-06-13T21:56:46+5:302024-06-13T21:58:45+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 BAN vs NED Live : Fifty by veteran Shakib Al Hasan, he has become the first player in T20Is to score 2500 runs and take 100+ wickets, Netherlands need 160 runs to win  | शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य

शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 BAN vs NED Live:  नॉक आऊट सामन्यात बांगलादेशने सुरुवातीच्या पडझडनंतर नेदरलँड्सला उत्तर दिले. अनुभवी शाकिब अल हसन मैदानावर उभा राहिला आणि महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. नेदरलँड्सने क्षेत्ररक्षणात उल्लेखनीय कामगिरी करताना बांगलादेशवर दडपण निर्माण केले होते, परंतु महमुदुल्लाहने आक्रमक फटकेबाजी करून शाकिबसह डाव सावरला. तंजिद सहनही चांगला खेळला. 

मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार


नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशचा सलमावीर नजमुल शांतो दुसऱ्याच षटकात रिव्हर्स स्वीप माराण्याच्या प्रयत्नात लेग स्लीपमध्ये विक्रमजीत सिंगला सोपा झेल देऊन परतला. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज लिटन दासने ( १) चौथ्या षटकात खणखणीत स्वीप शॉट मारला, परंतु इगलब्रेचने तितकाच अफलातून झेल घेऊन त्याला माघारी पाठवले. आर्यन दत्तने दोन्ही विकेट मिळवल्या. हसन आणि शाकिब अल हसन यांनी बांगलादेशचा डाव सावरला आणि पॉवरप्लेमध्ये संघाला २ बाद ५४ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांची ३२ चेंडूंतील ४८ धावांची भागीदारी पॉल व्हॅन मिकेरनने तोडली. हसन २६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ३५ धावांवर झेलबाद झाला. बांगलादेशला १० षटकांत ३ बाद ७८ धावा करता आल्या.


तोवहिद हृदयला ( ९) टीम प्रिंगलने अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. शाकिब आणि महमुदुल्लाह ही अनुभवी जोडी मैदानावर उभी राहिली आणि महत्त्वाच्या सामन्यात दमदार खेळ करून दाखवला. शाकिबने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, व्हॅन मिकेरनच्या पुढच्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात महमुदुल्लाह ( २५) झेलबाद झाला आणि शाकिबसह ४१ ( ३२ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. शाकिब हा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २५०० हून अधिक धावा आणि १०० हून अधिक विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला.  बांगलादेशने ५ बाद १५९ धावा केल्या. शाकिब ४६ चेंडूंत ९ चौकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. जॅकर अलीने ७ चेंडूंत नाबाद १४ धावा केल्या. 

Web Title: T20 World Cup 2024 BAN vs NED Live : Fifty by veteran Shakib Al Hasan, he has become the first player in T20Is to score 2500 runs and take 100+ wickets, Netherlands need 160 runs to win 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.